India vs Pakistan Blind Cricket Asia Cup Final Controversy: पावसामुळे अंतिम सामना रद्द, मात्र पाकिस्तानला विजेते घोषित केल्याने वाद; भारतीय संघाचा बहिष्कार

India vs Pakistan Blind Cricket Asia Cup Final Controversy: पावसामुळे अंतिम सामना रद्द, मात्र पाकिस्तानला विजेते घोषित केल्याने वाद; भारतीय संघाचा बहिष्कार

नेट रनरेटच्या निर्णयावर भारताचा आक्षेप; तोडगा निघेपर्यंत पाकिस्तानविरुद्ध न खेळण्याचा CABI चा इशारा

India vs Pakistan Blind Cricket Asia Cup Final Controversy संदर्भात मेन्स ब्लाइंड क्रिकेट आशिया कप २०२६ च्या अंतिम सामन्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात बांगलादेशची राजधानी ढाका येथे होणारा स्पर्धेचा अंतिम सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आणि सामना सुरू होण्यापूर्वी नाणेफेकही होऊ शकली नाही. मात्र, सामना न खेळताच पाकिस्तानच्या संघाला विजेता घोषित करण्यात आल्याने भारतीय संघाने या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. एवढेच नव्हे, तर भारतीय संघाने ट्रॉफी वितरण समारंभावरही बहिष्कार टाकला असून, या अंतिम निकालावरून वाद पेटला आहे.

ढाकामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मैदान खेळण्यायोग्य राहिले नाही, त्यामुळे पंचांना नाणेफेक करता आली नाही आणि अखेर सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. वृत्तानुसार, मेन्स ब्लाइंड क्रिकेट परिषदेच्या (WBCC) तांत्रिक समितीने भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांना संयुक्त विजेते घोषित करण्यास सहमती दर्शवली होती. मात्र, प्रत्यक्षात पाकिस्तानचा नेट रनरेट भारतापेक्षा चांगला असल्याचे सांगत त्यांना विजेतेपद देण्यात आले.

India vs Pakistan Blind Cricket Asia Cup Final Controversy: पंचांच्या निर्णयावर आक्षेप व गंभीर आरोप
पाकिस्तानला नेट रनरेटच्या आधारावर विजेता घोषित करण्याच्या निर्णयावर भारतीय संघाने आक्षेप घेतला आहे. पावसामुळे अंतिम सामना रद्द झाल्यानंतर नेट रनरेटच्या आधारे विजेता ठरवण्याचा नियम लागू होत नसल्याचे भारतीय संघाचे म्हणणे आहे.

Yash siddhi2

या संपूर्ण प्रकरणात मेन्स ब्लाइंड क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि पाकिस्तान अंध क्रिकेट परिषदेचे प्रमुख सुलतान शाह यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. समितीने दोन्ही संघांना संयुक्त विजेते घोषित करण्यास सहमती दर्शवली होती, मात्र सुलतान शाह यांनी समितीचा निर्णय बदलून पंचांना पाकिस्तानला विजेता घोषित करण्याचे निर्देश दिल्याचा आरोप आहे. पाकिस्तानला विजेता घोषित केल्यानंतर भारतीय खेळाडूंनी ट्रॉफी वितरण समारंभावर बहिष्कार टाकला, तर दुसरीकडे पाकिस्तानच्या खेळाडूंनी ट्रॉफी स्वीकारल्यानंतर केलेल्या जल्लोषाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तोडगा निघेपर्यंत पाकिस्तानविरुद्ध न खेळण्याचा CABI चा इशारा
या वादावर भारताच्या क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड इन इंडिया (CABI) या संस्थेने आक्रमक भूमिका घेतली आहे. CABI चे सचिव शैलेंद्र यादव यांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत स्पष्ट केले की, या संपूर्ण वादावर योग्य तोडगा निघेपर्यंत भारतीय ब्लाइंड क्रिकेट संघ पाकिस्तानविरुद्ध भविष्यात कोणताही सामना खेळणार नाही.

अंतिम सामन्यासाठी राखीव दिवसाबाबत प्रश्नचिन्ह
या वादात अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस का ठेवण्यात आला नव्हता, यावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस असणे आवश्यक होते; राखीव दिवस नसेल आणि पावसामुळे सामना होऊ शकला नाही, तर दोन्ही संघांना संयुक्त विजेते घोषित करणे अपेक्षित होते.