Ratnagiri Kartiki Ekadashi Fair: रत्नागिरीतील विठ्ठल मंदिर जत्रेत आपत्कालीन मार्ग मोकळे ठेवण्याची प्रभावी अंमलबजावणी; दुकानांचा मांडवी मार्गापर्यंत विस्तार

Ratnagiri Kartiki Ekadashi Fair: रत्नागिरीतील विठ्ठल मंदिर जत्रेत आपत्कालीन मार्ग मोकळे ठेवण्याची प्रभावी अंमलबजावणी; दुकानांचा मांडवी मार्गापर्यंत विस्तार

Ratnagiri Kartiki Ekadashi Fair साठी नगरपरिषद, व्यापारी आणि पोलिसांचे संयुक्त नियोजन; शनिवार मध्यरात्री निघणार पारंपरिक पालखी-रथ मिरवणूक

Ratnagiri Kartiki Ekadashi Fair संदर्भात रत्नागिरीतील विठ्ठल मंदिराच्या कार्तिकी एकादशी जत्रेत यंदा आपत्कालीन मार्ग मोकळे ठेवण्याच्या नियोजनाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे. व्यावसायिकांना आखून दिलेल्या रेषेच्या आतच दुकाने थाटण्याचे बंधन घालण्यात आल्याने पतितपावन मंदिर व काँग्रेस भवन परिसर ओलांडून थेट मांडवी मार्गापर्यंत जत्रेतील दुकानांचा विस्तार झाला आहे. गेल्या वर्षी ही दुकाने गाडीतळ ते काँग्रेस भवन परिसरापुरतीच मर्यादित होती.

गेल्या वर्षी जत्रेत व्यापाऱ्यांनी रस्त्यांवर दुकाने थाटल्याने नागरिक आणि ग्राहकांना ये-जा करताना मोठी गैरसोय झाली होती, तसेच गर्दीमुळे चेंगराचेंगरीची शक्यताही निर्माण झाली होती. हा अनुभव लक्षात घेऊन यंदा नगरपरिषद, बाजारपेठेतील व्यापारी आणि पोलिसांनी संयुक्त नियोजन केले. नगरपरिषदेचे अधिकारी विजय कदम, जितेश पोवार आणि कर्मचाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने मार्गातील दुकाने हटवून या नियोजनाची काटेकोर अंमलबजावणी केली.

Ratnagiri Kartiki Ekadashi Fair मधील आपत्कालीन वाहतुकीसाठी मोकळे ठेवलेले मार्ग
भाविकांची सुरक्षितता आणि आपत्कालीन वाहतुकीची सोय लक्षात घेता खालील मार्ग मोकळे ठेवण्यात आले आहेत:

Arihant 3

पटवर्धन हायस्कूल ते पऱ्याची आळी मार्ग

मारुती आळीतील मंदिराजवळचा पार्किंग मार्ग

गाडीतळ येथील स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्याजवळील एकमार्ग

पारंपरिक पूजाअर्चा आणि पालखी-रथ मिरवणुकीचे नियोजन
शुक्रवारी रात्री २ वाजल्यापासून विठ्ठल मंदिरात पूजाअर्चेला सुरुवात झाली आहे. आज, शनिवार मध्यरात्री पालखी-रथ मिरवणुकीला सुरुवात होणार आहे.

धनजी नाका दर्ग्याजवळ आरती झाल्यानंतर ही मिरवणूक रामआळी, तेलीआळी आणि मारुती आळीमार्गे विठ्ठल मंदिरात येईल. तेथून पालखी श्रीदेव भैरी मंदिरात नेण्यात येणार असून, हा संपूर्ण कार्यक्रम पहाटे ६ वाजेपर्यंत चालतो.