आढावा बैठकीत संभाव्य पाणीटंचाई व जलजीवन मिशनचा सखोल आढावा; कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाईचे निर्देश
रत्नागिरी : Yogesh Kadam Mandangad (योगेश कदम मंडणगड) दौऱ्यादरम्यान केवळ कार्यालयात बसून कागदी घोडे न नाचवता थेट फील्डवर उतरून प्रलंबित कामे मार्गी लावावीत आणि कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिला आहे. बुधवारी, २५ नोव्हेंबर रोजी मंडणगड पंचायत समितीच्या राजमाता जिजाऊ सभागृहात आयोजित ‘जलजीवन मिशन नळपाणी योजना आणि संभाव्य पाणीटंचाई आढावा बैठकीत’ ते बोलत होते.
या बैठकीत त्यांनी मंडणगड तालुक्यातील १४ प्रलंबित नळपाणी योजना पुढील १४ ते १५ दिवसांत पूर्ण करून प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू करण्याचे स्पष्ट आदेश दिले. तसेच, या सर्व योजनांच्या प्रगतीचा दैनंदिन अहवाल सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत.
Yogesh Kadam Mandangad बैठकीतील पाणीटंचाई उपाययोजना आणि प्रमुख निर्देश
यंदा कमी पावसामुळे उद्भवू शकणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी राज्यमंत्री योगेश कदम यांनी प्रशासनाला खालील महत्त्वाचे निर्देश दिले आहेत:

टँकर व जलस्रोत नियोजन: लहान टँकरची व्यवस्था करणे, स्वतंत्र टँकर खरेदीचा प्रस्ताव तयार करणे तसेच शासकीय आणि खासगी विहिरी व बोअरवेलच्या पाण्याची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले.
खासगी जलस्रोत अधिग्रहण: आवश्यकतेनुसार खासगी जलस्रोत अधिग्रहित करण्याचे आगाऊ नियोजन करण्यास सांगण्यात आले.
वनराई बंधारे व चेंबर्स दुरुस्ती: तालुक्यातील ३१० वनराई बंधाऱ्यांचा सविस्तर आढावा घेत नादुरुस्त बंधारे आणि पाण्याच्या चेंबर्सच्या दुरुस्तीचे प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे आदेश देण्यात आले.
या आढावा बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, पंचायत समिती सभापती प्रणाली चिले, उपसभापती दीपक मालुसरे, तहसीलदार अक्षय ढाकणे, गटविकास अधिकारी राजेंद्र आंधळे यांच्यासह ग्रामसेवक व विविध संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.













