Lanja Rasta Roko: मुंबई-गोवा महामार्गावर मनाई आदेश डावलून रास्ता रोको; शिवसेना ठाकरे पक्षाच्या जिल्हाप्रमुखांसह ७ पदाधिकारी व १२० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

Lanja Rasta Roko: मुंबई-गोवा महामार्गावर मनाई आदेश डावलून रास्ता रोको; शिवसेना ठाकरे पक्षाच्या जिल्हाप्रमुखांसह ७ पदाधिकारी व १२० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

अंजणारी बसस्टॉप येथे आंदोलन केल्याप्रकरणी लांजा पोलिसांत गुन्हा नोंद; वाहतूक रोखून प्रवाशांना त्रास दिल्याचा ठपका

लांजा : Lanja Rasta Roko (लांजा रास्ता रोको) प्रकरणी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अंजणारी बसस्टॉप येथे मनाई आदेश आणि पोलिसांची कायदेशीर नोटीस डावलून रास्ता रोको आंदोलन केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे पक्षाचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुख दत्तात्रय कदम यांच्यासह सात प्रमुख पदाधिकारी आणि १०० ते १२० कार्यकर्त्यांविरोधात लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.१५ ते १२.२५ या कालावधीत अंजणारी गावच्या हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावर हे आंदोलन करण्यात आले. अपर जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३१(१)(३) अन्वये जारी केलेल्या मनाई आदेशाची माहिती असताना तसेच लांजा पोलिसांकडून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६८ प्रमाणे नोटीस बजावूनही आंदोलकांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

Lanja Rasta Roko: महामार्गावरील वाहतूक रोखून घोषणाबाजी व गुन्ह्याचा तपशील
आंदोलकांनी महामार्गाच्या दोन्ही वाहिन्यांवर ठिय्या मांडून जोरदार घोषणाबाजी केली. पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येत बेकायदेशीर जमाव जमवून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना अटकाव केला आणि प्रवाशांना त्रास दिला. या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल नितेश नवनाथ राणे (वय ३३) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.०३ वाजता गुन्हा रजिस्टर क्रमांक ३११/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३(अ) आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Pednekar sankul

गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

दत्तात्रय जयराम कदम (वय ६६): जिल्हाप्रमुख, दक्षिण रत्नागिरी

रवींद्र भार्गव डोळस (वय ४२): उपजिल्हाप्रमुख, रा. लांजा

युवराज मारुती हांदे (वय ४७): लांजा तालुकाप्रमुख

नंदादीप ऊर्फ बंड्या नंदकुमार बोरुकर (वय ४५): संगमेश्वर तालुकाप्रमुख

प्रशांत शंकरराव साळुंखे (वय ५६): रत्नागिरी शहरप्रमुख

प्रकाश ऊर्फ बाबू शांताराम गुरव (वय ५२): उपशहरप्रमुख, लांजा

अभिजीत अनिल राजेशिर्के (वय ४२): युवा सेना लांजा तालुका अधिकारी

याशिवाय अन्य १०० ते १२० पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, लांजा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.