Supriya Sule apology देत म्हणाल्या, ‘विषय वाढवण्यात रस नाही’; संजय राऊतांच्या टीकेवरही दिली स्पष्ट प्रतिक्रिया
Supriya Sule apology देत पुण्यातील नियोजित आंदोलनाबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. रोहित पवार यांनी काल केलेल्या वक्तव्यावर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली असतानाच, आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी महिला कार्यकर्त्यांना शांततेचे व माघारीचे आवाहन केले आहे. रोहितने दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही कोणी आंदोलन करत असेल, तर त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली नसावी, असे सुळे यांनी म्हटले आहे.
रोहित पवारांचे विधान आणि आंदोलनाची पार्श्वभूमी
"पुण्याला कठोर पालकमंत्री देण्याची गरज आहे. सुनेत्रा वहिनींना अजितदादांसारखे काम येत नाही," असे विधान रोहित पवार यांनी काल केले होते. या वक्तव्याच्या निषेधार्थ आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येणार आहे. या घडामोडींच्या अनुषंगाने माध्यमांनी सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सविस्तर भूमिका मांडली.
कौटुंबिक संस्कार आणि दिलगिरीची भूमिका
रोहितकडून अनावधनाने कमी-जास्त वाक्य गेले असेल, तर त्याने दिलगिरी व्यक्त केल्याचे सुळे यांनी नमूद केले. दिलगिरी व्यक्त केल्यावर विषय संपतो, असे सांगत त्या म्हणाल्या की, भावना दुखावल्या गेल्या असतील तर रोहितच्या वतीने त्या अंतकरणातून हात जोडून विनंती करतात आणि स्वतःही सॉरी म्हणतात. असा कोणताही हेतू पक्षाचे धोरण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सुनेत्रा पवार या आपल्या मोठ्या भावाची बायको असून, ज्या संस्कारात आपण पवारांच्या घरात वाढलो, तिथे वयाने व पदाने मोठ्या असलेल्या व्यक्तीच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करण्यात कोणताही कमीपणा वाटत नसल्याचेही त्या म्हणाल्या. विषय वाढवण्यात आपल्याला रस नसून, अधिक काही हवे असेल तर तेही करण्याची तयारी त्यांनी दर्शवली.

संजय राऊत आणि संसदेच्या विशेष हिवाळी अधिवेशनावर भाष्य
डिलिमिटेशन विधेयकावरून संजय राऊत यांनी केलेल्या टीकेबाबत विचारले असता, सशक्त लोकशाहीत प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार असल्याचे सुळे यांनी सांगितले. राऊत हे आपले मोठे भाऊ तसेच महाराष्ट्राचे आणि देशाचे मोठे नेते असल्याने त्यांना मत मांडण्याचा अधिकार असून, जे वाटले ते त्यांनी मोकळेपणाने लिहिल्याचे त्या म्हणाल्या. संजय राऊत आपल्यावर टीका करतात असे आपल्याला अजिबात वाटत नसल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच संसदेच्या विशेष हिवाळी अधिवेशनाबाबत बोलताना, अधिवेशनाचा अजेंडा अद्याप आलेला नसल्याने त्यावर आत्ताच बोलता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.













