Rohit Sharma: आगामी २०२७ आयपीएल हंगामासाठी रोहित शर्मा पुन्हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार!

Rohit Sharma: आगामी २०२७ आयपीएल हंगामासाठी रोहित शर्मा पुन्हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार!

Rohit Sharma कडे मुंबई इंडियन्सचे नेतृत्व; हार्दिक पंड्याला पंजाबमध्ये ट्रेड केल्यानंतर फ्रँचायझीचा मोठा निर्णय

Rohit Sharma याची आगामी २०२७ च्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) हंगामासाठी मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी पुन्हा एकदा नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने आज या निर्णयाची अधिकृत घोषणा केली. गेल्या तीन हंगामांत संघाचे नेतृत्व करणाऱ्या हार्दिक पंड्याला पंजाब संघासोबत ट्रेड करून त्याच्या जागी अर्शदीप सिंगला संघात सामील करून घेतल्यानंतर मुंबईने अनुभवी रोहित शर्मावरच पुन्हा विश्वास दाखवला आहे.

२०१३ ते २०२३ या कालावधीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. २०२४ च्या हंगामापूर्वी संघ व्यवस्थापनाने रोहितच्या जागी हार्दिक पंड्याकडे नेतृत्वाची धुरा सोपवली होती. मात्र, हार्दिकच्या नेतृत्वाखाली गेल्या तिन्ही मोसमांत मुंबई इंडियन्सला अपेक्षित कामगिरी करता आली नाही.

अखेर संघ व्यवस्थापनाने हार्दिक पंड्याला ट्रेड करत नव्या हंगामासाठी पुन्हा अनुभवी कर्णधाराकडेच संघाची जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सच्या या घोषणेमुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये विशेषतः रोहित शर्माच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Horizon techno.

Rohit Sharma याची कर्णधारपदी निवड झाल्यानंतर प्रतिक्रिया
कर्णधारपदी निवड झाल्यानंतर रोहित शर्माने या निर्णयाबद्दल आनंद आणि कृतज्ञता व्यक्त केली आहे. मुंबई इंडियन्स हा आपल्या आयुष्याचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग राहिला असून या संघाचे नेतृत्व करणे नेहमीच अभिमानाची गोष्ट असल्याचे त्याने नमूद केले.

आगामी हंगामाबाबत नीता भाभी आणि आकाश यांच्यासोबत झालेली चर्चा अत्यंत उत्साहवर्धक होती, तसेच आपण एकत्रितपणे काय साध्य करू शकतो यावर पूर्ण विश्वास असल्याचेही रोहित शर्माने स्पष्ट केले.