लांजा : राजापूर विधानसभेवर पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाचा भगवा फडकविण्याचा निर्धार केला आहे. ही निवडणूक निष्ठा विरुद्ध दोन नंबरचा पैसा, अशी होणार असून त्यामध्ये खरी निष्ठा विजयी होईल, असा विश्वास उपस्थित ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व सर्व अंगीकृत संघटनांच्यावतीने दिवा (ठाणे) येथे आयोजित निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी शिवसेना उपनेते आमदार डॉ. राजन साळवी उपस्थित होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघातील मुंबईस्थित ठाणे ते दिवा, डोंबिवली, कल्याण, बदलापूर, कर्जत, कसारा परिसरातील कोकणी चाकरमान्यांनी या मेळाव्याला गर्दी केली होती. या मेळाव्यामध्ये ठाकरे सेनेला बळ देण्याचे आवाहन आमदार साळवी यांनी केले. या मेळाव्याला शहरप्रमुख सचिन पाटील, शहर संघटक रोहिदास मुंडे, युवासेनेचे सुमित भोईर, विधानसभा संघटिका योगीता नाईक, शहर संघटिका ज्योती पाटील, राजापूर तालुका संपर्कप्रमुख अनिल भोवड, लांजा तालुका संपर्कप्रमुख जगदीश जुलूम, संगमेश्वर तालुका संपर्कप्रमुख राजेश शेलार, शिवसहकारचे सुधीर मोरे, युवासेना विधानसभा संपर्कप्रमुख संदेश मिठारी, युवासेना दिवा शहराधिकारी अभिषेक ठाकूर, डोंबिवली उपविधानसभा अधिकारी ऋतुनिला पावसकर यांच्यासह मोठ्या संख्येने कोकणवासीय उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:04 AM 25/Sep/2024