राजधानी दिल्लीत १ आणि २ मे रोजी रंगणार ‘कोकण हापूस आंबा महोत्सव’!

नवी दिल्ली | प्रतिनिधी

उन्हाळ्याच्या दिवसात सर्वांचे लाडके फळ असलेल्या आंब्याची ओढ सर्वांनाच असते. त्यातही कोकणचा राजा ‘हापूस’ मिळणे म्हणजे एक मेजवानीच. आता दिल्लीकरांसाठी आनंदाची बातमी आहे. राजधानी दिल्लीमध्ये १ आणि २ मे रोजी ‘कोकण हापूस आंबा महोत्सवा’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

कुठे आणि कधी होणार महोत्सव? हा महोत्सव दिल्लीतील महाराष्ट्र सदन, कस्तुरबा गांधी मार्ग येथे आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र सदन आणि कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

महोत्सवाचे मुख्य उद्दिष्ट राजधानीतील नागरिकांना दर्जेदार आणि अस्सल हापूस आंब्याची चव चाखायला मिळावी आणि महाराष्ट्रातील कृषी अर्थव्यवस्थेला चालना मिळावी, हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील विशिष्ट हवामानात नैसर्गिकरीत्या पिकवलेला उच्च दर्जाचा हापूस आंबा हे या महोत्सवाचे मुख्य आकर्षण असणार आहे.

नागरिकांना आवाहान हा महोत्सव सर्व नागरिकांसाठी खुला असून, दिल्लीतील जास्तीत जास्त लोकांनी या महोत्सवाला भेट द्यावी आणि कोकणच्या या शाही मेजवानीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव श्रीमती आर. विमला यांनी केले आहे.

महोत्सवाची वैशिष्ट्ये:

  • अस्सल चव: नैसर्गिकरित्या पिकवलेला रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा हापूस.
  • थेट उपलब्धता: दिल्लीत राहणाऱ्या नागरिकांना थेट कोकणातील दर्जेदार आंबे मिळण्याची सुवर्णसंधी.
  • उपक्रमाचे महत्त्व: शेतकऱ्यांना बाजारपेठ आणि ग्राहकांना थेट दर्जा.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 29-04-2026