संगमेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस

संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले असून हळव्या भातशेतीचे मोठे नुकसान होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. गेले तीन दिवस सायंकाळी कोसळणाऱ्या पावसामुळे हळव्या भातशेतीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही ठिकाणी भातशेती कापण्यास सुरवात झाली. दोन दिवसांच्या पावसाने या शेतीत पाणी साचले आहे. महामार्गावर पाण्याचे योग्य नियोजन नसल्याने पाणी रस्त्यावर येत असून त्याचा फटका वाहनचालकांना बसत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:48 AM 26/Sep/2024