चिपळूण : स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत एस.टी. स्थानक ते बावशेवाडी जोड रस्ता येथे ‘एक झाड आईच्या नावे’ वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. सदर वृक्षारोपण मोहीम चिपळूण नगर परिषद हद्दीतील अरिहंत लेक सिटी येथे लोकसहभागातून व महिला बचत गट सदस्य यांच्या उपस्थितीत ही मोहीम राबविण्यात आली. ही मोहीम चिपळूण नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच राबविण्यात आली.
यावेळी नगर परिषेचे उपमुख्याधिकारी सतीश दंडवते, कार्यालय अधीक्षक अनंत मोरे, आरोग्य निरीक्षक महेश जाधव व सुजित जाधव, लेखापाल अवधूत बेंद्रे, वरिष्ठ लिपीक विजय गमरे, प्रसाद (बापू) साडविलकर, राजेंद्र जाधव, सचिन जाधव, सुशांत मोहिते, निखिल कांबळे, प्रज्ञा गमरे, कैमुद्दीन गवंडी, प्रतिमा बुरटे, प्रतिमा विचारे, सूरज सकपाळ, दीपक किंजळकर, संकेत मोहिते, रोहन सकपाळ, राजेंद्र नवरत तसेच उद्यान विभाग व आरोग्य विभाग कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:46 PM 26/Sep/2024