रत्नागिरी : नेहरू युवा केंद्राने राबवले ‘एक पेड मा के नाम’ अभियान

रत्नागिरी : दि. 28 नोव्हेंबर 2024 रोजी, नेहरू युवा केंद्र रत्नागिरी यांच्या मार्फत एक पेड माॅ के नाम कार्यक्रमांतर्गत वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. या कार्यक्रमाला नेहरू युवा केंद्राचे राष्ट्रीय युवा स्वयंसेवक अनिकेत जाधव व जे. वाय. शिर्के हायस्कूल कुटरे चे मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग उपस्थित होते.

या अभियानांतर्गत आंबा, फणस, बकुळ, जांभुळ इत्यादी प्रकारची जवळपास 20 पेक्षा जास्त सदाहरित वनस्पती रोपांची लागवड करण्यात आली.

शाळेतील मुलांनी स्वतः खड्डे खोदून हे अभियान यशस्वी पणे राबविले. वृक्षारोपण कार्यक्रम झाल्यावर विद्यालयातील सर्व मुलांना नेहरू युवा केंद्र रत्नागिरी यांचेकडून चहा नाष्टा देण्यात आला.

शाळेचे जेष्ठ शिक्षक श्री पी. डी. पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना सदर अभियाना विषयी मार्गदर्शन करताना नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेवकांचे स्वागत केले व वृक्षारोपणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सावंत मॅडम यांनी सदर ऊपक्रमासाठी कुटरे हायस्कूलची निवड केल्या बद्दल अनिकेत जाधव यांचे आभार मानले. तसेच लागवड केलेली झाडे प्रत्येक वर्गाने तीन या प्रमाणे दत्तक घेऊन त्यांचे संगोपन करण्याची संकल्पना विद्यार्थ्यां समोर ठेवली, व सर्व विद्यार्थ्यांनी या संकल्पनेवर काम करण्याचा निर्धार केला.

अशा प्रकारे अत्यंत ऊत्साह पुर्ण वातावरण सदर वृक्षारोपण अभियान पार पडले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:01 29-11-2024