रत्नागिरी : पालकमंत्री उदय सामंत आणि सिंधुरत्न योजनेचे सदस्य आमदार किरण सामंत यांच्या प्रयत्नातून कोकणच्या पर्यटनाला मोठी चालना मिळत आहे.
रत्नागिरी जिल्ह्याच्या पर्यटन वाढीसाठी आणि महिला बचत गटांच्या उत्पन्न वाढीसाठी केरळ राज्याप्रमाणे रत्नागिरी जिल्हा परिषदेने सिंधुरत्न विकास योजनेंतर्गत चार आधुनिक पर्यटन बस तसेच पाच हाऊसबोट विकत घेतल्या आहेत. यातील काही पर्यटन बस रत्नागिरीत दाखल झाल्या असून पहिली हाऊसबोट रत्नागिरीच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे.. हाऊसबोट याचा लोकार्पण सोहळा लवकरच होवून त्यांची सेवा सुरु होणार आहे. या सर्व पर्यटन बस आणि हाऊस बोट जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:02 30-11-2024