Prime Minister Narendra Modi : खाद्यतेलावर मोठ्या प्रमाणात परकीय चलन खर्च होत आहे. त्यामुळं त्याचा कमी वापर करावा. खाद्यतेलाचा वापर कमी केल्यास देशाला आणि स्वत:ला फायदा होईल. तसेच शक्य तिथे ऑनलाईन मिटिंग घ्याव्यात, शाळांनी ऑनलाईन क्लासेस घ्यावेत असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi) यांनी केलं आहे.
गेल्या 24 तासात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा हे आवाहन केलं आहे. आपण शेतकऱ्यांची मुलं आहोत. आपल्याला रासायनिक खतांपासून शेतीला वाचवावं लागेल. त्यामुळं शेतकऱ्यांना आता रासायनिक खतांपासून मुक्ती मिळवण्याचा मार्ग अवलंबने गरजेचं असल्याचं पंतप्रधान म्हणाले. नैसर्गिक शेतीकडे वाटचाल करावी असेही ते म्हणाले.
पश्चिम आशियातील तणावाचा भारतावरही परिणाम
जग विविध संकटांचा सामना करत आहे पहिल्यांचा कोरोनाचे संकट, त्यानंतर आर्थिक संकट आणि आता पश्चिम आशियात वाढत जाणारा तणाव. याचा परिणाम संपूर्ण जगावर पडत आहे. भारतावरही याचा परिणाम होत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. कोरोना संकट हे सगळ्यात मोठं संकट होते. आता पश्चिम आशियात सुरु असणारे युद्ध हे देखील या दशकातील मोठे संकट आहे. या संकटातून आपणही पुढे जाऊ असे पंतप्रधान म्हणाले.
आपण सर्वांनी मिळून देशावर पडणारा बोजा कमी करु
या विरपरीत पस्थितीत आपणा सर्वांचं योगदान महत्वाचं असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. आपल्याला कर्तव्याला प्रथामिकता द्यावी लागेल. देश संकटातून जात आहे असे पंतप्रधान म्हणाले. आपण सर्वांनी मिळून देशावर पडणारा बोजा कमी करु असेही मोदी म्हणाले. भारत करोडो रुपयांची विदेशी मुद्रा खर्च करत आहे. किंमती मोठ्या प्रमाणात वाढत आहे, पुरवठा साखळी विस्कळीत झाली असल्याचे पंतप्रधान यावेळी म्हणाले. सर्वांनी छोटो छोटे योगदान देणं गरजेचे आहे.
परिस्थिती सामान्य होत नाही तोपर्यंत छोटे संकल्प करावे
ज्या क्षेत्रातून कच्च तेल मिळत आह, तिथेच युद्ध सुरु आहे. त्यामुळं परिस्थिती सामान्य होत नाही तोपर्यंत छोटे संकल्प करावे लागतील असे पंतप्रधान म्हणाले. जिथे गरज आहे तिथे पेट्रोल डिझेलचा उपयोग कमी करा, मेट्रोचा वापर करा, इलेक्ट्रीक बस वापरा, पब्लिक ट्रानस्पपोर्टचा वापर करा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. वर्क फ्रॉम होमला प्राथमिकता द्या, ऑनलाईन काम करा. इंधननही खाण्याचे तेलावरही मोठ्या प्रमाणात परकीय चलन खऱ्च होते. कमी वापर केल्यास देशाला आणि स्वतला फायदा होईल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:03 12-05-2026














