कायद्याचे ज्ञान अद्ययावत असणे गरजेचे : जिल्हा न्यायाधीश अंबळकर

रत्नागिरी : रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विलास पाटणे आणि सहकारी यांनी विविध विषयांवर कायदे तज्ञांची व्याख्याने आयोजित करून सर्वांना कायद्याचे अद्ययावत ज्ञान मिळण्यासाठी अत्यंत स्तुत्य असा उपक्रम सुरू केला आहे. त्याचा आपण सर्वांनी लाभ घेऊया. कायद्याचे ज्ञान अद्ययावत असणं ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर यांनी केले.

रत्नागिरी जिल्हा न्यायालयाच्या आवारात हॉलचे विस्तारीकरण व सुशोभीकरण प्रारंभाप्रसंगी ते बोलत होते. नव्या हॉलच्या विस्तारीकरणामुळे वकिलांची सोय झाली आहे. रत्नागिरी जिल्हा न्यायालय परिसरातील सर्व सुधारणा कामे जलदगतीने होण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया, असेही जिल्हा न्यायाधीश अंबाळकर म्हणाले.

पालकमंत्री असताना आमदार उदय सामंत यांच्या प्रयत्नामुळे ३० लाखांचा निधी उपलब्ध झाल्याने वकिलांचा प्रश्न मार्गी लागला आहे. नवीन हॉलच्या गच्चीवर केंद्र शासनाच्या योजनेतून १.२५ कोटींचा हॉल होण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असे रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विलास पाटणे यांनी सांगितले. लवकरच न्यायाधिश टी. वी. नलावडे, ॲड. अभय खांडेपारकर, ॲड. हर्षद निंबाळकर यांची विविध विषयांवर आपण व्याख्यानं आयोजित करत आहोत, अशी माहिती त्यांनी दिली. या प्रसंगी ॲड. फजल डिंगणकर, ॲड. अनिरूद्ध फणसेकर, ॲड. रत्नदीप चाचले ॲड. पी. एस. शेट्ये, ॲड शाल्मली आंबुलकर, ॲड. संध्या सुखटणकर, ॲड. अवधूत कळंबटे, ॲड. श्रीरंग भावे, ॲड. पराग शिंदे, ॲड. शिवराज जाधव, ॲड. सचिन रेमणे, ॲड. राहुल चाचे आदी मान्यवर उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:26 30-11-2024