हर्णे बंदरातील मासेमारी तीन आठवडे बंद, कोट्यावधींचे नुकसान

हर्णे : गणेशोत्सव आणि अचानक बदललेल्या वातावरणामुळे हर्णे बंदरातील मासेमारी उद्योगाला ब्रेकच लागला आहे. दोन दिवसांपूर्वी काही मच्छीमारांनी आपल्या नीका मासेमारीसाठी समुद्रामध्ये लोटल्या आहेत, परंतु अचानक या परीच्या पावसाने वादळसदृश परिस्थिती निर्माण झल्याने मच्छीमारांनी मासेमारीला जाण्याचे थांबवले. यामुळे आता बंदर गजबजयला अजून एक आठवडा जाण्यासाठी शक्यता आहे. किमान तीन आठवडे बंद मासेमारी व्यवसायामुळे करोडो रुपयाचे नुकसान झाल्याने येथील मच्छीमार बांधवानी सांगितले.

शासनाच्या नियमानुसार १ ऑगस्टपासुन चालू झालेल्या मासेमारी उद्योगाला चांगल्या प्रकारे सुरुवात ५ ते६ ऑगस्टपासून झाली होती मासळी बंपर मिळू लागली होती परंतु बहुतांशी मासळीचे गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी ५० टक्केने दर घसरले होते तरही किमान ३०० ते ४०० नौका या वेळी मासेमारीला उतरल्या होत्या किमने दोन आठवडे चांगले गेले आणि ऑगस्ट महिन्यात पुन्हा वादळाने तोंड वर काढले त्यामध्ये किमान ८ ते १० दिवस मासेमारी थांबली होती. पुन्हा वातावरण शांत झाल्यानंतर मासेमारीला सुरवात झाली ती ६ सप्टेंबरपासून थांबली, गणेशोत्सवामुळे मासेमारी उद्योगच बंद होता.

अनंत चतुर्दशीनंतर मासेमारीला सुरुवात होणार होती, परंतु गेल्या दोन दिवसांपासून परतीच्या पावसाने जोर केला आहे तसेच ३५ ते ४० किमी वेगाने वारेदेखील वाहत आहेत, अशी ही परिस्थिती किमान अजून दोन दिवस असण्याची शक्यता आहे, असे येथील मच्छीमारं’नी सांगितले. त्यामुळे मासेमारीता ब्रेक लागला आहे. वावावरण शांत झाल्याशिवाय मासेमारीला नौका जाणार नाहीत. अजूनही दोन ते तीन दिवस रारी मच्छीमारांना शांतच बसावे लागणार आहे, म्हणजे हा महिना मासेमारीविनाच जाणार आहे.

हर्णे मासेमारी उद्योग बंदमुळे रोजची मासळी विक्रीतून होणारी करोडो रुपयांची उलाढाल थांबली आहे. गणेशोत्सवासाठी खलाशी सुटी घेतात, परंतु उत्सव संपल्यावर मासेमारी लगेचच चालू होणार अचानक आलेल्या वादळसदृश परिस्थितीने तोंडचे पाणी पळाले आहे. मच्छीमार मासेमारीला गेले तर या बंदर मासळीच्या लिलावाने गजबजायला सुरवात झाली असती, असा बेत नौकामालकाचा होता वादळामुळे थांबलेली मासेमारी आता चालू व्हायला अजूनही तीन ते चार दिवस लागतील. गणेशोत्सवानंतर सुमारे १०० नौना मासेमारीला समुद्रात उरल्या आहेत. काही नौकांची तयारी सुरू होती, तर काही नौकांचे नाखवा खलाशांच्या शोधात आहेत तर काहींकडे सुरू करण्यासाठी आर्थिक पाठबळ नसल्याने समुद्रामध्ये मासेमारीला उतरायचे थांबले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:40 PM 26/Sep/2024