सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याबाबत आम्ही भ्रष्टाचार झाल्याची माहिती समोर आणल्याने पोलीस आम्हाला नोटीस बजावत असल्याची प्रतिक्रिया ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईकांनी दिली.
तर नाईकांच्या पोलीस चौकशीवरून, माजी खासदार निलेश राणेंनी टीका केली आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळा दुर्घटनेत वैभव नाईकांचं नाव घेणं, लज्जास्पद असून… असं काय झालं की वैभव नाईकांवर संशय घ्यावा लागला, असा सवालही निलेश राणेंनी उपस्थित केला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी तज्ञ समितीने अहवाल सादर केला आहे. तज्ञ समितीने दिलेल्या अहवालात वेल्डिंग नीट झाली नव्हती किंवा गंज चढला अशी माहिती दिली आहे. मात्र वेल्डिंग नीट झाली नव्हती की नंतर बिघडवण्यात आली हा विषय राहतो. याच कारणामुळे आमदार वैभव नाईक यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं. या चौकशीतून योग्य ती माहिती बाहेर पडेलच, असे निलेश राणे म्हणाले.
वैभव नाईकांवर संशय घ्यावा लागला ही लाज वाटण्यासारखी गोष्ट : निलेश राणे
मात्र या पुतळा दुर्घटना प्रकरणी वैभव नाईक यांचं नाव येणे खरोखरच लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. असं काय झालं की वैभव नाईक यांच्यावर संशय घ्यावा लागला. वैभव नाईकांवर संशय घ्यावा लागला ही लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. एवढ्या मोठ्या विषयात आमदार म्हणून वैभव नाईक यांचे नाव आले हा शरमेने मान खाली घालायचा विषय आहे, अशी टीका माजी खासदार निलेश राणे यांनी वैभव नाईक यांच्यावर केला आहे.
पोलिसांनी नोटीस बजवल्यानंतर काय म्हणाले वैभव नाईक?
संवेदनशील विषयात पोलिसांनी आरोपी संदर्भात माहिती देणं गरजेचं होत. पहिल्या पासून आमचं पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाला हे आरोप तेव्हाही होते आणि आताही आहेत. आम्ही भ्रष्टाचार बाबत माहिती समोर आणत असल्याने पोलीस आम्हाला नोटीस बजावत आहेत. जयदीप आपटे आणि चेतन पाटील यांच्या व्यतिरिक्त कोणाचीही चौकशी केली नाही. अहवालात स्पष्ट नमूद केलं की महाराजांचा पुतळा उभारण्यात भ्रष्टाचार झाला हे समोर आल आहे. चुकीच्या पद्धतीने पुतळा उभारला तर त्यांचं बिल अदा का करण्यात आलं. अहवाल सादर केला तो खरा असेल तर पुतळा उभारण्यात भ्रष्टाचार झाला असून दोषींवर लवकरात लवकर कारवाई करावी. जयदीप आपटे याचं स्टेटमेंट बाहेर आल तर दोषी कोण आहेत हे समोर येईल, असे वैभव नाईक म्हणाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:21 26-09-2024