IPS Transfer: महाराष्ट्र पोलीस दलातील 21 अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या एक दिवस अगोदर महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गृह विभागानं यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. गृह विभागाच्या शासन निर्णयानुसार जालना, अमरावती ग्रामीण, नाशिक ग्रामीण, अहिल्यानगर,परभणी, नंदूरबार, चंद्रपूर, ठाणे ग्रामीण, वाशिम या जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांची बदली करण्यात आली आहे.

याशिवाय फोर्सवनचे पोलीस अधीक्षक गजानन राजमाने यांची बदली करण्यात आली आहे. राज्य गुप्तवार्ता, नगरी हक्क संरक्षण यास इतर अधिकाऱ्यांच्या देखील बदल्या करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्राच्या गृहविभागाकडून करण्यात आलेल्या पोलिसांच्या बदल्या

अ.क्र.पोलीस अधिकाऱ्याचे नावविद्यमान पदस्थापनाबदलीनंतरची पदस्थापना
1अजय के. बन्सलपोलीस अधीक्षक, जालनापोलीस अधीक्षक, सायबर सुरक्षा, महाराष्ट्र राज्य
2सिंगुरी विशाल आनंदपोलीस अधीक्षक, अमरावती (ग्रामीण)पोलीस अधीक्षक, धुळे
3बाळासाहेब पाटीलपोलीस अधीक्षक, नाशिक (ग्रामीण)पोलीस उप आयुक्त, मुंबई शहर
4सोमनाथ घार्गेपोलीस अधीक्षक, अहिल्यानगरसहायक पोलीस महानिरीक्षक (नि. व स.), पोलीस महासंचालक कार्यालय
5रविंद्रसिंह एस. परदेशीपोलीस अधीक्षक, परभणीउप आयुक्त, राज्य गुप्तावार्ता विभाग, मुंबई.
6संदीप घुगेउप आयुक्त, राज्य गुप्तावार्ता विभाग, मुंबई.पोलीस उप आयुक्त, मुंबई शहर
7श्रवण दत्तपोलीस अधीक्षक, नंदुरबारअपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) आणि सहायक पोलीस महानिरीक्षक आस्थापना यांचे स्टाफ ऑफिसर
8मुम्मका सुदर्शनपोलीस अधीक्षक, चंद्रपुरपोलीस अधीक्षक, अहिल्यानगर
9धोडोंपत एस. स्वामीपोलीस अधीक्षक, ठाणे (ग्रामीण)पोलीस अधीक्षक, नाशिक (ग्रामीण)
10अनुज मिलिंद तारेपोलीस अधीक्षक, वाशिमपोलीस अधीक्षक, अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, पुणे
11अनुराग जैनपोलीस अधीक्षक, नगरी हक्क संरक्षणपोलीस उप आयुक्त, मुंबई शहर
12अश्विनी सानपपोलीस अधीक्षक, लोहमार्ग पुणेपोलीस अधीक्षक, नंदुरबार
13तेगबीर सिंह संधुअपर पोलीस अधीक्षक, मालेंगावपोलीस अधीक्षक, जालना
14राजकुमार शिंदेपोलीस उप आयुक्त, पुणे शहरपोलीस अधीक्षक, लोहमार्ग पुणे
15निकेश खाटमोडेपोलीस अधीक्षक, अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, पुणेपोलीस अधीक्षक, वाशिम
16आयुष नोपानीअपर पोलीस अधीक्षक, जालनापोलीस अधीक्षक, चंद्रपुर
17पंकज कुमावतअपर पोलीस अधीक्षक, अमरावती (ग्रामीण)पोलीस अधीक्षक, परभणी
18निकेतन कदमपोलीस उप आयुक्त, परिमंडळ-५, नागपुरपोलीस अधीक्षक, अमरावती (ग्रामीण)
19सुरज गुंजालअपर पोलीस अधीक्षक, परभणीअपर पोलीस अधीक्षक, मालेंगाव
20गजानन राजमानेपोलीस अधीक्षक, फोर्स वनपोलीस उप आयुक्त, मुंबई शहर
21दत्ता लक्ष्मण तोटेवाडअपर पोलीस महासंचालक (विशेष कृती), महाराष्ट्र राज्य यांचे स्टाफ ऑफिसरअपर पोलीस अधीक्षक, अमरावती

आयुष नोपानी चंद्रपूरचे नवे पोलीस अधीक्षक, असतील. सध्या ते जालना येथे अपर पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत आहेत. विद्यमान पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांची अहिल्यानगर येथे पोलीस अधिक्षक पदावर बदली झाली आहे. आयुष नोपाणी यांनी याआधी चंद्रपूर जिल्ह्यात उपविभागीय पोलीस अधिकारी (वरोरा) म्हणून केलं काम आहे.

नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची बदली झाली असून त्यांच्या जागी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून डॉ. डी एस स्वामी यांची नियुक्ती झाली आहे. नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्यावर मुंबई पोलीस उपायुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

नितेश खाटमोडे वाशिमचे नवीन पोलीस अधीक्षक असतील. या पूर्वी 16 एप्रिल रोजी राजेंद्र शिंदे यांचे वाशिमचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून नाव जाहीर झालं होतं. मात्र आता नवीन नाव आल्याने जिल्ह्यात चर्चेला विषय मिळाला आहे.

धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक पदी विशाल आनंद शिंगूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक असलेल्या विशाल आनंद यांची या ठिकाणी नियुक्ती झाली आहे. तब्बल दहा ते बारा दिवसानंतर धुळे जिल्ह्याला पोलीस अधीक्षक मिळाले आहेत.

परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांची बदली झाली असून ते आता उपायुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग मुंबई म्हणून काम पाहतील. अमरावतीचे अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत परभणीचे नवीन पोलीस अधीक्षक असतील.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:14 01-05-2026