रत्नागिरी : कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित

गणपतीपुळे : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या राज्याच्या विविध भागातील सुमारे ३० पर्यटक निवासांचे खासगीकरण करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला होता. या खासगीकरणाला विरोध म्हणून महाराष्ट्रातील कंत्राटी कर्मचारी जागतिक पर्यटन दिनानिमित्त काळ्या फिती लावून आंदोलन तयारीत होते. हे आंदोलन स्थगित करण्यात आले.

पर्यटक विकास कर्मचारी संघाचे सरचिटणीस अशोक खामकर यांनी २५ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ प्रधान कार्यालय मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी यांची भेट घेऊन कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत महत्त्वपूर्ण चर्चा केली. या चर्चेत सूर्यवंशी यांनी कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या सोडवण्याचे अश्वासन दिले. यामुळे पर्यटन विकास कर्मचारी संघाचे अध्यक्ष तथा आमदार सचिन भाऊ अहिर यांच्या सूचनेनुसार २७ सप्टेंबर रोजी आंदोलन करण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला असल्याचे खामकर यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:15 27-09-2024