रत्नागिरी : स्वच्छता ही सेवा मूलमंत्र जपणाऱ्या कोकण रेल्वेने रत्नागिरी स्थानकावर टाकाऊ स्पेअर पार्टपासून रोबो आणि आकर्षक लॅम्प बनवण्याचा उपक्रम राबविला आहे.
स्वच्छता अभियानांतर्गत कोकण रेल्वेने विविध उपक्रम सर्व रेल्वे स्थानकांवर राबवले आहेत. रत्नागिरी स्थानकातही स्वच्छता अभियानासह पर्यावरण जनजागृती करण्यात येत आहे. रत्नागिरी तांत्रिक विभाग (मेकॅनिकल) येथील अभियंता प्रीतम पणदूरकर आणि आणि सहकारी कर्मचारी यांनी टाकाऊपासून टिकाऊ ही संकल्पना राबवताना रेल्वे इंजिनच्या निरुपयोगी पार्टपासून रोबोची प्रतिकृती तयार केली आहे. घरामध्ये अंतर्गत सजावटीसाठी उपयोगी पडणारे शोभिवंत इलेक्ट्रिक लॅम्प बनविले आहेत.
पर्यावरण संतुलनासाठी कचऱ्याचे कसे व्यवस्थापन करावे, याची रत्नागिरी रेल्वे स्थानकावर प्रवाशांना माहिती देण्यात येत आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांमार्फत कचरा व्यवस्थापनाची पत्रके आणि घोषवाक्य प्रवाशांमध्ये वितरित केली जात आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:34 27-09-2024