देशाच्या संसदीय पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस समितीच्या अध्यक्षपदी खा. सुनिल तटकरे यांची निवड

मुंबई : देशाच्या संसदीय पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस समितीच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांची निवड झाली असून याबाबत त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

देशात सर्वाधिक गतीने मागणी, पुरवठा आणि आर्थिक वृध्दीदर असलेल्या पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस क्षेत्रात सुनिल तटकरे यांना सन्मानाचे पद मिळाले आहे. महाराष्ट्रासह रायगडसाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे.

राज्यसभा व लोकसभेतील ३१ खासदारांचा या समितीमध्ये समावेश असून रायगडचे खासदार सुनिल तटकरे हे या समितीचे अध्यक्ष झाले आहेत. सध्या देशातील सर्व क्षेत्रात पेट्रोलियम व नैसर्गिक गॅसच्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ होत आहे. दरवर्षी साधारणतः ३ ते ५ टक्के इतका वृध्दीदर या क्षेत्राचा आहे. देशाच्या आर्थिक वृध्दीदरात या क्षेत्राचे सर्वाधिक योगदान आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यापार, परस्पर संबंधाबाबत पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस क्षेत्राचे महत्व अनन्यसाधारण आहे. आयात-निर्यात धोरण, पायाभूत सुविधा आणि औद्योगिक वृध्दीदरात या क्षेत्राचा अग्रकम आहे. त्यामुळे देशाच्या प्रगती व समृध्दीचा पाया म्हणून पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस महत्वाचे आहे. पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस या क्षेत्राला देशाच्या आर्थिक प्रगतीचे ‘इंधन व इंजिन’ मानले जाते. त्यामुळेच अनन्यसाधारण महत्व असलेल्या संसदीय समितीच्या अध्यक्षपदाची धुरा खासदार सुनिल तटकरे यांच्याकडे आल्याने हा महाराष्ट्राचा सन्मान असल्याचे बोलले जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:07 PM 27/Sep/2024