रत्नागिरी : रत्नागिरी शहरात माळ नाका येथे असणाऱ्या सीएनजी पंपात नेहमीच गॅसचा तुटवडा जाणवत असल्याने वाहन चालक कमालीचे त्रस्त आहेत.
शहरामध्ये साळवी स्टॉप येथे पहिला पंप होता. त्यानंतर जुना माळ नाका येथे एसटी महामंडळाच्या जागेत नवीन सीएनजी पंप सुरू झाला. सुरुवातीला या पंपावर व्यवस्थितपणे गॅस पुरवठा होत होता. मात्र सध्या या पंपावरील गॅस नेहमीच संपलेला असतो. तर अनेक वेळा गॅस असूनही प्रेशर कमी असल्याने वाहन चालकांना पुरेशा प्रमाणात गॅस मिळत नाही. दुसरा पंप सुरू होऊन देखील वाहन चालकांना गॅस टंचाईला सामोरे जावे लागत आहे.
सध्या अशोका गॅस कंपनीकडून हा पंप महानगर गॅस कडे हस्तांतरित करण्यात आला आहे. गॅसच्या होणाऱ्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे वाहन चालक कमालीचे त्रस्त असून प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:43 14-12-2024