बदलापूर : बदलापुरातील चिमुकल्या विद्यार्थिनींसोबत घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली अटकेत असलेला आरोपी अक्षय शिंदे त्याला पोलिसांनी एन्काउंटरमध्ये ठार केले. हा एन्काउंटर फेक असल्याच्या संशयावरून आता सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने देखील या एन्काउंटरवर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
मुंबईतील वकील घनश्याम उपाध्याय यांच्याकडून ही याचिका दाखल केली गेली आहे. या जनहित याचिकेत त्यांनी अनेक मागण्या देखील केल्या आहेत. हा एन्काउंटर फेक असल्याचा आरोप करत याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमुर्तींच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्याची याचिकेत मागणी केली आहे. तसेच या एसआयटीकडून एन्काउंटर प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यापूर्वी हायकोर्टाने एन्काउंटर प्रकरणी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण आल्यानंतर पोलिसांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:05 28-09-2024