राजिवडा मच्छीमार्केट हटविण्यासाठी नागरिक आंदोलन करण्याच्या तयारीत

रत्नागिरी : शहरातील प्रभाग क्रमांक 15 मधील राजिवडा मच्छीमार्केट हे रस्त्यावर अतिक्रमण करुन भरवला जात आहे. या मार्केट मुळे स्थानिक नागरिकांना खूपच त्रास होत असून तेथून जाणे येणे जिकरीचे होत आहे. मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूंनी हा व्यवसाय होत असल्याने शाळकरी मुलं, महिला, ज्येष्ठ नागरिक यांना अडचणीचा सामना करावा लागतो. कधी कधी मच्छी व्यावसायिक व नागरिक यांच्यात शाब्दिक चकमकी होतात. दिवसभर मच्छी विक्री होत असल्याने प्रचंड प्रमाणात घाणीचं साम्राज्य पसरले आहे. कुत्री,घुशी वावरत आहेत. अनेक लहान मुलांना व ज्येष्ठ नागरिक यांचा चावा ही घेण्यात आला आहे. शहरातील अनेक अतिक्रमण नगर परिषदेने हटविले आहे, मात्र राजिवडा मच्छीमार्केट अतिक्रमण असतानाही ते हटवत नसल्याने आश्चर्य वाटत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

याबाबतीत अनेकदा नागरिकांनी नगर परिषदेला या गंभीर बाबींबाबत लेखी निवेदने दिली आहेत, मात्र या अस्वच्छता आणि अतिक्रमण बाबत काहीच कार्यवाही झालेली नाही.

यासाठी शिवखोल, राजिवडा येथील नागरिक व जमातुल मुस्लिमीन शिवखोल यांनी या बाबत मुख्याधिकारी रत्नागिरी नगर परिषद ला या मच्छी मार्केट चे फोटो सह लेखी निवेदन सादर केले असून 1 ऑक्टोबर अखेर जर हे मच्छीमार्केट या जागेवरून हटविले नाही तर 2 ऑक्टोबर पासून नागरिक आंदोलन करणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:21 28-09-2024