चिपळूण : खेर्डीत कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र

चिपळूण : युवक युवतीना महाविद्यालयांमध्येच कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र’ ही नावीन्यपूर्ण योजना महाराष्ट्र राज्य शासनाच्या कौशल्य विकास विभागाच्यावतीने सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये चिपळूणमधील खेर्डी येथे गुरुकुल महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश प्रणालीने या महाराष्ट्रातील १ हजार नामांकित महाविद्यालयांमधील आचार्य चाणक्य कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राचे उद्‌घाटन करण्यात आले. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना यासारख्या अनेक विकास पोक्नांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संगणक प्रणालीद्वारे उद्‌घाटन केले. यावेळी गुरुकुल महाविद्यालयाचे प्राचार्य दरेकर भाजपच्या शहर मंडल चिटणीस प्रणाली सावर्डेकर,अमृता जोशी, आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:49 PM 28/Sep/2024