रत्नागिरी : दिनांक १७ डिसेंबर २०२४ रोजी सैतवडे गावातील न्यू ईरा इंग्लिश स्कूल येथे हिवाळी वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री.अजीम भाई चिकटे यांनी उपस्थिती दर्शवली. तसेच याचे उद्घाटन यांचे हस्ते झाले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक वर्ग यांच्या वतीने मान्यवरांचे फुलांचा गुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. सोहळ्याच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा विषयक जागृतता वाढवण्याच्या उद्देशाने स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमाला उपस्थित गुंबद सरपंच उषा सावंत यांनीही मुलांना मार्गदर्शन केले व खेळाविषयी शुभेच्छा दिल्या. अशाप्रकारे सर्वांची भाषण झाल्यानंतर अजीम भाईंनी विद्यार्थ्यांच्या हॉलीबॉल स्पर्धेसाठी टॉस उडवून खेळाची सुरुवात करून दिली. खेळाची सुरुवात अत्यंत उत्साहात आणि जोमाने सुरू झाली. यामध्ये क्रिकेट, लंगडी, कबड्डी, खो-खो, डॉज बॉल, उंचउडी, थाळीफेक, लिंबू चमचा, १०० मीटर धावणे, थ्रो बॉल, कॅरम, लुडो, रस्सीखेच असे विविध प्रकारचे खेळ खेळले गेले.
दिनांक २१ डिसेंबर २०२४रोजी वार्षिक बक्षीस वितरण समारंभ पार पाडण्यात आला. सकाळी १०.३० वाजता कार्यक्रमास सुरुवात झाली. सगळ्यांच्या उपस्थितीत मान्यवरांचे शाळेचे मुख्याध्यापक श्री.इम्रान अंतुले यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी शाळेचे कमिटी सदस्य नगमा खान, अजीम माद्रे, गनी खतीब, हशमत निवेकर उपस्थित होते.
नागमा खान यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना मोलाचा संदेश दिला. सर्वांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि आनंदात पार पडला. या कार्यक्रमाला सुरुवातीपासून मा.श्री.आजीम भाई चिकटे, गुंबद ग्रामपंचायत सरपंच उषा सावंत, उपसरपंच मुनाफ वागळे, जयगड सरपंच सौ.फर्जाना डांगे, जयगड मुस्लिम एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष श्री.मुश्ताक टेमकर,जयगड गावचे विशेष कार्यकारी अधिकारी तथा सोशल मीडिया समन्वय श्री. तौसीफ पांढरी, श्री.गणेश झगडे, श्री.मुस्ताक मुल्ला, सैतवडे समाजसेवक श्री.अल्ताफ खतीब, डॉ. मोहिते, श्री. समीउद्दीन माद्रे, गुंबद मोहल्ला अध्यक्ष श्री.रशीद खलपे. तसेच शाळेचे सेक्रेटरी श्री.सादिक कापडे, सदस्य इकबाल लांबे, अब्दुल समद कापडे, श्री.रफिक खलपे, श्रीमती फरमिन निवेकर, श्रीमती नगमा खान, श्री.मुनाफ वागले, श्री. अजिज माद्रे, श्री.गनी खतीब, श्री. हशमत निवेकर, मुख्याध्यापक,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,पालक वर्ग तसेच विद्यार्थी उपस्थित होते. शाळेचा क्रीडा महोत्सव आणि वार्षिक बक्षीस वितरण समारंभ अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने पार पडला. तसेच क्रीडा समितीमधील सहाय्यक शिक्षिका प्राजक्ता खारवटकर, मुस्कान खान आणि अलविना पेटकर यांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचे विशेष आभार मानण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:27 23-12-2024