मंडणगड : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यभूमीला 49 वर्षांनंतर मंत्रिपद देऊन शिवसेनेसह महायुती सरकारने दापोली मतदारसंघाला खर्या अर्थाने न्याय दिला असल्याचे प्रतिपादन गृहराज्य मंत्री ना. योगेश कदम यांनी केले. मंडणगडमध्ये आयोजित नागरी सत्कार समारंभात ते बोलत होते.
दापोली विधानसभा क्षेत्राचे आमदार व नवनिर्वाचित राज्यमंत्री योगेश कदम यांचा भिंगळोली येथील श्रीकृष्ण सभागृहात सोमवार दि. 23 रोजी नागरी सत्कार आयोजित करण्यात आला. आ. योगेश कदम हे राज्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच मंडणगडमध्ये आले होते. कार्यक्रमात तालुक्यातील गावांमधील नागरिक, महायुती व विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संस्था, शासकीय विभागातील अधिकारी यांनी कदम यांचा सत्कार केला.
यावेळी ना. योगेश कदम म्हणाले की, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री होणे ही सोपी गोष्ट नाही, मात्र सर्व मतदारांनी मला निवडून देत आमदार केले म्हणून मी आज मंत्री झालो. त्यामुळे मंत्रिपदाचा हा सन्मान केवळ माझा नसून माझ्या दापोली मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाचा आहे.
यावेळी विधानसभा क्षेत्रप्रमुख आदेश केणे, संदेश चिले, तालुकाप्रमुख प्रताप घोसाळकर, सुधीर कालेकर, शशिकांत चव्हाण, सचिव सिद्धेश देशपांडे, युवा सेना कार्यकारणी सदस्य चेतन सातोपे, शहर प्रमुख विनोद जाधव, नगरसेवक योगेश जाधव, भाजप तालुकाध्यक्ष आप्पा मोरे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष मुझफ्फर मुकादम, काँग्रेस तालुकाध्यक्ष मुश्ताक मिरकर, रिपाईंचे जिल्हासरचिटणीस आदेश मर्चंडे, समद मांडलेकर तसेच सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
मंडणगड एमआयडीसीची लवकरच मुहूर्तमेढ
मंत्रिपदाच्या माध्यमातून कोकणाचा विकास साध्य करू. दापोली मतदार संघाचा विकासाच्या द़ृष्टीने कायापालट करणारा महत्त्वपूर्ण प्रकल्प मंडणगड एमआयडीसीची मुहूर्तमेढ लवकरच करणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:21 25-12-2024














