दापोली : जिल्हा परिषद रत्नागिरी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष आयोजित टाकाऊ वस्तूंची कलाकृती स्पर्धा या स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज टाळसुरे विद्यालयाची विद्यार्थिनी गार्गी रेवाळे प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहे.
दापोली तालुक्याचे जिल्हास्तरावर प्रतिनिधित्व करण्याची संधी तिला प्राप्त झाली आहे. पंचायत समिती दापोली येथे आयोजित केलेल्या या स्पर्धेत गार्गी रेवाळे हिने काचेच्या व प्लास्टिकच्या बाटल्यांपासून शोभेच्या वस्तू तयार करणे, पर्यावरणाला हानिकारक ठरणाऱ्या बाटल्यांचा पुनर्वापर करून त्यावर वारली पेंटिंगने शोभेच्या वस्तू तयार केल्या. कचऱ्याचा पुनर्वापर कमीत कमी खर्चात करून या वस्तू तयार केल्याने तालुका स्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहे.
गार्गीन मिळविलेल्या या यशाबद्दल दापोली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तसेच गार्गी हिला मार्गदर्शन करणारे पालक, शिक्षक तसेच सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:35 PM 28/Sep/2024