संगमेश्वर : देवरूख आगाराचा अनागोंदी कारभार सुरूच असून, त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. सकाळी सव्वासहा वाजता सुटणारी संगमेश्वर-रत्नागिरी गाडी गेले महिनाभर बंद असल्याने कॉलेज आणि शाळेतील विद्यार्थ्यांना आणि कामगारांना त्रास सहन करावा लागत आहे महिनाभराचा काढलेला पास फुकट जात आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
गाडी बंद असल्याबाबत विद्यार्थ्यांच्या पालकांनी वारंवार आगार व्यवस्थापकांना सोमवारी विभागीय कार्यालयातही सूचना करूनही गाडी पूर्ववत होत नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे. सकाळी सहा वाजता जाणारी बस ९ वाजता परत येते.
त्यामुळे संगमेश्वरापासून संगमेश्वर-बुरंबीकडे जाणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना त्या माहीचा फायदा होत होता. गाडी बंद झाल्यामुळे सकाळी संगमेश्वरपासून रत्नागिरीकडे जाणान्य शाळा आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांना, कामगारांना त्रास सहन करावा लागत आहे.
वांद्रीपासून संगमेश्वर, देवरूखकडे जाणाऱ्या शाळेतील विद्यार्थी आणि कामगारांची गैरसोय होत आहे. विभागीय कार्यालयाकडून सूचना करूनही त्यांच्या सूचनांना वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्याचे पालकांचे म्हणणे आहे. महिला व वृद्धांना मिळणाऱ्या सोयीमुळे एसटीच्या प्रवासात वाढ होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 AM 26/Dec/2024














