Chiplun Samadhisthal Vandalism: चिपळूण तालुक्यात ४०० वर्षे जुन्या ऐतिहासिक समाधीस्थळाची तोडफोड; १७ जणांवर गुन्हा दाखल

अलोरे-शिरगाव पोलिसांची कारवाई; सुकाई मंदिरासमोरील पालांडे परिवाराच्या समाधीचे जेसीबीने नुकसान

चिपळूण:

चिपळूण तालुक्यातील नागावे येथे धार्मिक, ऐतिहासिक आणि कौटुंबिक वारसा असलेल्या पालांडे परिवाराच्या सुमारे ४०० वर्षे जुन्या पारंपरिक समाधीस्थळाची कथित तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी अलोरे-शिरगाव पोलिसांनी सखोल तपास करून एकूण १७ जणांविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या तोडफोडीमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून मोठी खळबळ उडाली आहे.

जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने तोडफोड केल्याची तक्रार

नागावे-पालान्डेवाडी येथील रहिवासी शिवाजी दत्ताराम पालांडे यांनी २३ जानेवारी रोजी या संदर्भात अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, नागावे येथील सुकाई मंदिरासमोरील सर्व्हे क्रमांक ३५, हिस्सा क्रमांक १९ मधील जागेवर पालांडे परिवाराचे पिढ्यान्पिढ्यांपासूनचे पारंपरिक समाधीस्थळ आहे. या स्थळाला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. मात्र, काही व्यक्तींनी जुन्या वादातून किंवा अन्य कारणाने जेसीबी व इतर यंत्रसामग्रीच्या सहाय्याने या समाधीची तोडफोड करून नुकसान केल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला होता.

सखोल चौकशीनंतर संशयितांची नावे निष्पन्न; १७ जणांवर गुन्हा

पोलिसांनी या संवेदनशील प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तक्रारीची सखोल चौकशी केली, संबंधित कागदपत्रांची पडताळणी केली आणि प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर तोडफोड प्रकरणी खालील संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे:

Hotel waiter

  1. प्रकाश पुतळाजी शिंदे
  2. प्रकाश बाबू चिपळूणकर
  3. विष्णू भीमाजी साळवी
  4. सुरेश बाबू साळवी
  5. सुशांत श्रीधर साळवी
  6. सुरेश नारायण साळवी
  7. संजय अनंत झगडे
  8. दीपक विठ्ठल साळवी
  9. रामचंद्र कृष्णा वीर
  10. दत्ताराम कृष्णा वीर
  11. अनंत भीमाजी साळवी
  12. महादेव गणपत साळवी
  13. दीपक यशवंत चिपळूणकर
  14. संभाजी पांडुरंग बगडे
  15. मंगेेश मनोहर निगडे
  16. तोडफोडीसाठी वापरण्यात आलेल्या जेसीबी व ट्रॅक्टरचे चालक आणि मालक

अशा एकूण १७ जणांचा यामध्ये समावेश आहे.

भारतीय न्याय संहितेच्या (BNS) नवीन कलमांनुसार गुन्हा दाखल

या तोडफोड प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अलोरे-शिरगाव पोलिसांनी संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम २९८, २९९, ३०१, ३२४(२) आणि ३२९(३) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. ऐतिहासिक वास्तू आणि धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अलोरे-शिरगाव पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:15 17-07-2026