रत्नागिरी : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने महाराष्ट्रातील सर्वांत जुन्या १९६ वर्षाच्या रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाच्या नव्या इमारतीमध्ये प्रशस्त सभागृह होणार आहे. याचा आनंद केवळ माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना नव्हे तर या परिसरातील सर्वांना होईल, वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वेळी हा कार्यक्रम होत असून, या इमारत बांधणीसाठी लागेल ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन माजी मंत्री, आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिले.
शहरातील जयस्तंभ येथील (जिल्हा) वाचनालयाच्या नवीन वास्तूच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये व कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.
यावेळी व्यासपीठावर पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित, वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष अॅड. पटवर्धन म्हणाले की, १८२८ साली जे. आर. डी. टॉर्च यांनी सुरू केले. लवकरच १९७ वे वर्ष पूर्ण होईल. महाराष्ट्रातले सर्वांत जुने पण सर्वांत अद्ययावत हे वाचनालय आहे. ज्या शहरातली वाचनालये गजबजलेली असतात तिथली संस्कृती टिकून राहते व बहरते. आजच्या मोबाईलच्या युगातही २२०० सभासद येथे नियमित येतात, ही वाचनालयाची ताकद आहे. लोकमान्य टिळकांचे वडील या वाचनालयाचे सदस्य होते.
प्राचार्य कै. डॉ. सुभाष देव यांच्या स्मरणार्थ सुखदा देव यांनी एक लाख रुपयांचा धनादेश वाचनालयाकडे सुपुर्द केला.
यावेळी उद्योजक दीपक गद्रे, डॉ. श्रीधर ठाकूर, अॅड. नेने, अॅड. बाबा परुळेकर, सुधाकर सावंत, अॅड. विनय आंबुलकर, अॅड. शाल्मली आंबुलकर, डॉ. अरुण डिंगणकर, अँह, श्रीराम भावे, अॅड, अशोक कदम, डॉ. नितीन चव्हाण, प्रा. प्रभाकर केतकर, सौ. केतकर, गौरांग आगाशे, बिजय देसाई, अभिजित हेगशेट्ये, प्रतिभा प्रभुदेसाई, सीए एच. एल. पटवर्धन, अभिजित पटवर्धन, बबनराव पटवर्धन, शिल्पा मराठे, प्रज्ञा भिडे यांसह अनेकजण कार्यक्रमाला उपस्थित होते.
नगर वाचनालयाचे नामकरण
स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी केले आहे. या वाचनालयात स्वामी स्वरूपानंद नियमित येत होते. दिवंगत नगराध्यक्ष डॉ. ज. शं. केळकर व आमदार कुसुमताई अभ्यंकर, माजी खासदार अॅड. बापूसाहेब परुळेकर, डॉ. वि. म. शिंदे, दादा शेट्ये आदी नीय व्यक्ती या संस्थेचे पदाधिकारी होते. या बाचनालयात एक लाख १५ हजारपेक्षा जास्त ग्रंथसंपदा व दुर्मीळ ग्रंथही आहेत.
उद्योगमंत्र्यांची भरीव मदत
वाचनालयाच्या जागेचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित होता, मात्र, याकरिता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी हा प्रश्न सोडवून वाचनालयाला पुन्हा जागा उपलब्ध झाली. तसेच सामंत यांनी भरीव आर्थिक मदत केल्याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख अॅड. पटवर्धन यांनी भाषणात केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:10 PM 28/Dec/2024













