वाल्मीक कराड हा शरण यावा, हा योगायोग की शरण येण्यासाठी घडवलेलं नाट्य : आ. भास्कर जाधव

रत्नागिरी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यामध्ये काल चर्चा झाली आणि आज वाल्मीक कराड हा शरण यावा, हा योगायोग की शरण यावा यासाठी घडवलेलं नाट्य आहे. महाराष्ट्राच्या मनात शंका यावी, असे सर्व आहे. मग कृष्ट वाल्मीक कराडचा राजकीय बोलवता धनी कोण? त्याचं नाव अनेकांनी घेतलं. पोलिसांची हतबलता की, त्याला राजकीय संरक्षण आहे, असे आरोप महाविकास आघाडीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी महायुती सरकारवर केले.

शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बीड येथील संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यात गाजत आहे. यामध्ये या हत्याप्रकरणातील संशयित आणि दोन कोटी रुपयाच्या खंडणी प्रकरणातील फरार आरोपी वाल्मीक कराडवरून सत्ताधारी महायुतीच्या सरकारला विरोधीपक्षाने कोंडीत पकडले आहे. याबाबत महाविकास आघाडीतील आमदार जाधव म्हणाले, वाल्मीक कराड हा बीड प्रकरणाचा कर्ता करविता असल्याचे संपूर्ण महाराष्ट्र सांगतोय. पोलिसदलाचे नाव मोठं आणि लक्षण खोटं, अशी परिस्थिती झाली आहे.

वाल्मीक कराड शोधण्यासाठी वेगवेगळी पथकं स्थापन केली.

राज्यकर्त्यांनी मोठी भाषा केली; पण वाल्मीक कराड पुण्यात शरण येतो; पण पोलिसांच्या हाताला लागत नाही की, लावला गेला नाही याबाबत साशंकता आहे. वाल्मीक कराडचा राजकीय बोलवता धनी कोण? त्याचं नाव अनेकांनी घेतलं. पोलिसांची हतबलता की, त्याला राजकीय संरक्षण आहे. वाल्मीक शरण येतो यातून महाराष्ट्राची जनता बोध घेईल, असे सूचक वक्तव्य जाधव यांनी केले.

Vinayka motars

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 AM 01/Jan/2025