संगमेश्वर: कळंबस्ते भीमनगर येथे विजय तुकाराम मोहिते (५२) याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना सोमवार २ जानेवारी रोजी घडली. याबाबत संगमेश्वर पोलीस ठाण्यात भरत भाऊ मोहिते यांनी खबर दिली आहे. विजय हे घरी एकटे असताना त्यांनी घराचे ओटीवर फॅन करीता लावलेल्या लोखंडी भाल्याला नायलॉनची दोरी बांधली. अन् त्याच्या दुसऱ्या टोकास गळफास तयार करुन प्लास्टीक टेबलावरुन उडी मारली. अशी खबर पोलिसात देण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल एस. एन. कामेरकर करीत आहेत.














