राजापूर : नाटेत भरदिवसा बिबट्याचा मुक्त संचार

राजापुर : गेल्या काही महित्यांपासून तालुक्याच्या विविध भागांतील लोकवस्तीमध्ये बिबट्याचा मुक्तपणे संचार सुरू आहे. नाटे येथे सायंकाळच्या सुमारास बिबट्या लोकवस्तीमध्ये फिरताना अनेकांना दिसल्याची माहिती येथील ग्रामस्थ नीतेश तिवरमकर यांनी दिली. दिवसाढवळ्या फिरणाऱ्या या बिबट्यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली असून, सायंकाळी उशिरापर्यंत घराबाहेर राहण्याऐवजी घरामध्ये लवकर परतण्याला लोकांकडून पसंती दिली जात आहे.

तालुक्यातील अनेक गावांमधील लोकवस्तीमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये बिबट्याचा मुक्तपणे संचार सुरू असल्याचे अनेकवेळा आढळून आले आहे. गेल्या काही दिवसांपासून नाटे परिसरामध्ये लोकवस्तीमध्ये मुक्तपणे फिरणारा बिबट्या आढळल्याने भीतीचे वातावरण परसरले आहे. नाटे येथे लोकवस्तीमध्ये मुक्तपणे फिरणाऱ्या बिबट्याने गावातील कुत्रे, मांजर यांना गेल्या काही दिवसांमध्ये लक्ष्य केले आहे. काही दिवसांपूर्वी सायंकाळी लोकवस्तीमध्ये बिबट्या मुक्तपणे फिरत असल्याचे लोकांना आढळून आले आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागातर्फे बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी तिवरमकर यांच्या नाटे येथील लोकांकडून केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:30 PM 30/Sep/2024