देवरुख : योगासने करण्यात तरबेज असलेले संगमेश्वर तालुक्यातील कळंबुशी गावचे सुपुत्र दिलीप लक्ष्मण चव्हाण (झरेकर) यांनी सह्याद्री विद्या दिलीप चव्हाण मंदिर भांडूप कोकणनगर येथे झालेल्या योग कार्यक्रमात २ तास ७ मिनिटे सुप्त वज्रासनात बसून जागतिक विक्रम करून आपले नाव कोरले आहे. या योगाची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांनी घेतली असून नुकतेच रितसर सर्टिफिकेट सुद्धा त्यांना प्राप्त झाले आहे. जगात आज लाखो लोक योगा शिकतात व इतरांना शिकवतात.
आपण यापेक्षा वेगळे आहोत, ही ताकद आज जगासमोर दाखवून दिली आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:40 PM 30/Sep/2024
