WPL 2025, MI vs GG : मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात एलिमिनेटर सामना

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेचा थरार आता अंतिम टप्प्यात आला आहे. दिल्ली कॅपिटल्सने गुणतालिकेत टॉपला राहात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तर दुसऱ्या संघासाठी मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात लढत होणार आहे.

या स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सने 8 सामने खेळत 5 विजय आणि 3 पराभवांसह एकूण 10 गुण मिळवले आहेत. यासह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आणि थेट अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. दिल्ली कॅपिटल्सने तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पुन्हा एकदा अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स संघ त्यांच्या प्रतिस्पर्ध्याची वाट पाहत आहे. 13 मार्चला एलिमिनेटर सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स यांच्यात ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे.

मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स या स्पर्धेत दोन वेळा आमनेसामने आले आहेत. दोन्ही वेळेस मुंबई इंडियन्स गुजरात जायंट्सला लोळवलं आहे. 18 फेब्रुवारीला झालेल्या साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सला 5 विकेटने पराभूत केलं. तर 10 मार्चला झालेल्या दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजराज जायंट्सला 9 धावांनी पराभूत केलं आहे. जर एलिमिनेटर फेरीत गुजरातने विजय मिळवला, तर आयपीएलच्या तिसऱ्या पर्वात नवा विजेता मिळू शकतो. कारण मागच्या दोन पर्वात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने विजय मिळवला आहे. मुंबईने गुजरातला हरवत अंतिम फेरी गाठली तर दुसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरण्याची संधी आहे.

दोन्ही संघाचे खेळाडू

मुंबई इंडियन्स : हरमनप्रीत कौर (कर्णधार) , अक्षिता माहेश्वरी , अमनदीप कौर , अमनजोत कौर , अमेलिया केर , क्लो ट्रायॉन , हेली मॅथ्यूज , जिंतिमनी कलिता , कीर्थना बालकृष्णन , नदिन डी क्लर्क , नॅट सायव्हर-ब्रंट साजारी , नॅट सायव्हर -ब्रंट साजारी , कमलिनी , यास्तिका भाटिया , सायका इशाक , शबनीम इस्माईल , पारुनिका सिसोदिया.

गुजरात जायंट्स : भारती फुलमाली , लॉरा वोल्वार्ड , फोबी लिचफिल्ड , सिमरन शेख , ॲश्ले गार्डनर , डॅनिएल गिब्सन , दयालन हेमलता , डिआंड्रा डॉटिन , हरलीन देओल , बेथ मुनी ( कर्णधार) , काशवी गौतम , मन्नत प्रिषीक , मन्नत प्रिषक , मिकस, , शबनम मो. शकील , सायली सातघरे , तनुजा कंवर

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:26 12-03-2025