रत्नागिरी : जिल्हा परिषदेची सुशिक्षित बेरोजगार अभियंता व मजूर सहकारी संस्था यांच्याकरिता काम वाटप समितीची सभा येत्या मंगळवारी, दि. १८ मार्च रोजी होणार आहे. त्यादिवशी सकाळी साडेअकरा वाजता ही सभा जिल्हा परिषदेच्या कै.
शामराव पेजे सभागृहा होणार असल्याचे जिल्हा परिषदेचे कार्यकार्यकारी अभियंता आणि काम वाटप समितीच्या सदस्य सचिवांनी कळविले आहे.या सभेमध्ये १० लाखाच्या आतील कामांचे वाटप होणार आहे. यावेळी मजूर सहकारी संस्था (पूर्ण जिल्हा), सुशिक्षित बेरोजगार अभियंता (विद्युत) आणि सुशिक्षित बेरोजगार अभियंता (स्थापत्य, संपूर्ण जिल्हा) यांच्यासाठी काम वाटप होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:17 12-03-2025














