चिपळूण : तालुक्यातील कुशिवडे शिगवणवाडी क्र. २ मराठी शाळेला रत्नागिरी जिल्हा परिषदेचा आदर्श शाळा पुरस्कार जाहीर झाला आहे. तत्पूर्वी या शाळेने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा अंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ हा देखील पुरस्कार मिळवला आहे. कुशिवडे या खेडेगावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुशिवडे शिगवणवाडी क्र. २ ही पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे. चिपळूण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी उमा घारगे पाटील, गटशिक्षणाधिकारी दादासाहेब इरनक, शिक्षण विस्तार अधिकारी राजअहमद देसाई, सुभाष भुवड, केंद्रीय प्रमुख विजय कवितके या अधिकाऱ्यांनी शिक्षकांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक प्रवीण शिवडे तसेच सतिश सावर्डेकर यांना शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक-पालक संघ, माता-पालक संघ यांचे पुरस्कारासाठी सहकार्य लाभले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:06 PM 12/Mar/2025














