रत्नागिरी : थिबा पॅलेस येथे ‘मनसे’चे रास्ता रोको

रत्नागिरी : शहरातील थिबा पॅलेस रोड जवळील शासकीय वाहनतळासाठी आरक्षित असलेल्या जागेचे आरक्षण उठवून ठेकेदार राजेंद्र जैन यांनी त्या जागेवर व्यावसायिक इमारत बांधण्यासाठी तेथे असलेली झाडे तोडून टाकली.

याच्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) पदाधिकारी आक्रमक झाले असून, बुधवार (८ जानेवारी) मनसेचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांच्या नेतृत्वाखाली दुपारी १२ वाजता रास्ता रोको करून आंदोलन केले. मनसेच्या मागण्या विचारत घेऊन नगर पालिकेचे मुख्याधकारी तुषार बाबर यांनी लावलेले पत्रे काढून टाकण्यात येतील व १० झाडे तोडण्याची परवानगी असताना १०० झाडांची कत्तल केल्याप्रकरणी त्यानुसार दंड करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात येईल, असे सांगण्यात आल्यावर मनसेने हे आंदोलन थांबवले.

याबाबत बोलताना मनसे अध्यक्ष अविनाश सौदंळकर यांनी म्हणाले की, ग्रीन झोन पट्टा असूनसुद्धा या लोकांनी अनधिकृत बांधकाम केले. कालपर्यंत पालिकेचे मुख्याधिकारी तुषार बाबर उडवा उडवीची उत्तर देत होते आणि आज आमच्यासमोर बॅक डेटची जी परमिशन घेऊन आले आहेत परमिशन फक्त १० झाडांची परमिशन दिलेली असतानाही १०० च्यावर इथे या विकासाकाने झाडांची कत्तल केलेली आहे. रत्नागिरी नगरपालिका बिल्डरांचे पोट भरण्यासाठी पूर्णपणे सक्षम झाली आहे. या बिल्डरांचे पोट भरले तर यांचे खिसे भरतात, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

परंतु जेव्हा रिजर्वेशन प्लॉट टाकतात तेव्हा त्याचा विकास आराखडा तयार करायचा असतो. विकास आराखडा तयार करतात, तेव्हा पैशांची तरतूद सुद्धा करायची असते; परंतु न्यायालयाचे आदेश असून सुद्धा ही लोक न्यायालयात जात नाहीत. त्यामुळे पैशांची तरतूद करत नाहीत. आरक्षण उठल्यानंतरही लोकं प्रायव्हेट बिल्डरांच्या माध्यमातून त्यांच्याकडून विषय भरले जातात, असा आमचा आक्षेप असल्याचे श्री. सौंदळकर यांनी सांगितले. तसेच यापुढे नगरपालिकेचा मनमानी कारभार चालू देणार नाही, असा इशाराही दिला.

हे आंदोलन पोलीस प्रशासने मध्यस्थी करून थांबवले. बिल्डरने इमारत बांधण्यासाठी लावलेले पत्रे काढण्यासाठी लिखित पत्र देत असल्याचे तसेच ज्यांनी झाडाची कत्तल केली आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल करून दाखल करून जो काय दंड असेल तो आकारला जाईल, अशी भूमिका पोलिसांनी घेतल्याची माहिती श्री. सौदंळकर यांनी सांगितले. रत्नागिरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री. बाबर यांनी झाडे परवानगी घेऊन तोडली आहेत, ती परत लागवड करावी असे आदेश नगरपालिकेने विकासकाला दिल्याचे सांगितले. या जमिनीवर ग्रीन झोन नाहीये, हे आपण लक्षात घेतले पाहिजे, असे स्पष्ट करतानाच इथे पार्किंगचा आरक्षण होते ते डायरेक्ट नगर रचनालय पुणे यांनी आरक्षण बदलले आहे. राजेंद्र जैन म्हणून जे विकसक (बिल्डर) आहेत, त्यांनी ते आरक्षण बदलून आणल्याचेही बाबर यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:00 09-01-2025