कोकण रेल्वेत २०१ पदांसाठी मोठी भरती; ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होणार

ज्युनिअर इंजिनिअर, स्टेशन मास्टर, असिस्टंट लोको पायलट, ट्रॅक मेंटेनर, कमर्शियल सुपरवायझरसह विविध पदांचा समावेश

आमच्या नोकरी विषयक WhatsApp ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा

रत्नागिरी : कोकण रेल्वेत नोकरीची वाट पाहणाऱ्या युवकांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) ने विविध विभागांतील एकूण २०१ पदांच्या भरतीसाठी रोजगार अधिसूचना (Employment Notification No. CO/P-R/02/2026) प्रसिद्ध केली असून, ऑगस्ट २०२६ च्या शेवटच्या आठवड्यात ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

भरती प्रक्रियेत सिव्हिल, सिग्नल अँड टेलिकॉम (S&T), ऑपरेटिंग, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि कमर्शियल विभागांतील विविध पदांचा समावेश आहे. यामध्ये ज्युनिअर इंजिनिअर, सीनियर सेक्शन इंजिनिअर, स्टेशन मास्टर, सेक्शन कंट्रोलर, गुड्स ट्रेन मॅनेजर, असिस्टंट लोको पायलट, टेक्निशियन-III, ESTM-III, ट्रॅक मेंटेनर आणि कमर्शियल सुपरवायझर या पदांसाठी भरती केली जाणार आहे.

कोणत्या पदांसाठी किती जागा?

भरतीतील प्रमुख पदांमध्ये पुढील जागांचा समावेश आहे –

  • ट्रॅक मेंटेनर – ५७
  • असिस्टंट लोको पायलट – ३०
  • ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल) – २५
  • ESTM-III – १५
  • स्टेशन मास्टर – १५
  • टेक्निशियन-III – १५
  • गुड्स ट्रेन मॅनेजर – १०
  • सेक्शन कंट्रोलर –
  • ज्युनिअर इंजिनिअर (मेकॅनिकल) –
  • कमर्शियल सुपरवायझर –
  • सीनियर सेक्शन इंजिनिअर (मेकॅनिकल) –
  • सीनियर सेक्शन इंजिनिअर (S&T) –

पगार किती मिळणार?

निवड झालेल्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन दिले जाणार आहे.

  • लेव्हल-७ पदांसाठी प्रारंभिक वेतन – ₹44,900
  • लेव्हल-६ पदांसाठी – ₹35,400
  • लेव्हल-५ पदांसाठी – ₹29,200
  • लेव्हल-२ पदांसाठी – ₹19,900
  • लेव्हल-१ (ट्रॅक मेंटेनर) – ₹18,000 प्रारंभिक वेतन असेल.

कोण अर्ज करू शकतात?

भरतीसाठी पुढील उमेदवार पात्र असतील –

  • कोकण रेल्वेसाठी जमीन संपादित झालेल्या भूसंपादित (Land Loser) कुटुंबातील पात्र सदस्य.
  • कोकण रेल्वे मार्गावरील रोजगार विनिमय कार्यालयात (Employment Exchange) नोंद असलेले महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकातील उमेदवार.
  • महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकचे अधिवास (Domicile) असलेले पात्र उमेदवार.
  • किमान तीन वर्षे नियमित सेवा पूर्ण केलेले KRCL कर्मचारी.

भरतीत प्राधान्यक्रम कसा असेल?

कोकण रेल्वेने भरतीसाठी स्पष्ट प्राधान्यक्रम निश्चित केला आहे.

  1. भूसंपादित (Land Loser) उमेदवार
  2. कोकण रेल्वे मार्गावरील रोजगार विनिमय कार्यालयात नोंद असलेले उमेदवार
  3. महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकचे अधिवासी तसेच KRCL कर्मचारी

या प्राधान्यक्रमानुसार निवड यादी तयार करण्यात येणार असून, प्रथम भूसंपादित उमेदवारांची निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच पुढील गटांचा विचार केला जाणार आहे.

वयोमर्यादा

ग्रुप ‘C’ पदांसाठी वयोमर्यादा १८ ते ३६ वर्षे असून ट्रॅक मेंटेनर (माजी ग्रुप ‘D’) पदासाठी १८ ते ४५ वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी, माजी सैनिक, दिव्यांग आणि इतर पात्र प्रवर्गांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत देण्यात येणार आहे.

आरक्षणाची तरतूद

या भरतीमध्ये अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), इतर मागासवर्गीय (OBC-NCL), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), माजी सैनिक (Ex-Servicemen) आणि दिव्यांग (PwBD) उमेदवारांसाठी नियमानुसार आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे.

उमेदवारांनी काय लक्षात ठेवावे?

कोकण रेल्वेने स्पष्ट केले आहे की, अर्ज प्रक्रिया ऑनलाइन होणार असून ती ऑगस्ट २०२६ च्या शेवटच्या आठवड्यात सुरू होईल. पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवून अधिकृत अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर वेळेत अर्ज करावा.