वृद्धाश्रम हे आनंदाश्रम व्हावेत : प्रवीण कांबळे

रत्नागिरी : वृद्धाश्रमात कोणीही स्वेच्छेने येत नाही. आपल्या आजूबाजूला निर्माण झालेली सामाजिक परिस्थिती, कौटुंबिक परिस्थितीमुळे वृध्दाश्रमात येणे भाग पडते. परंतु वृध्दाश्रम हे निराधाराना आधार देणारे प्रमुख केंद्र आहे. त्यामुळे वृध्दाश्रम हे आनंदाश्रम व्हावेत, यासाठी शासनाने या घटकाला चांगल्या आरोग्य सुविधा, आहार विहार करण्याच्या सुविधा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सातारा जिल्हाध्यक्ष प्रवीण कांबळे यांनी केले.

रत्नागिरी येथील माहेर वृद्धाश्रमात मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून फळे वाटप करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विशाल भोसले, संदीप सुतार, संस्थेचे प्रकल्प प्रमुख सुनील कांबळे उपस्थित होते.

राज्य मराठी पत्रकार संघ व सामाजिक कार्यकर्ते विशाल भोसले यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात आला. कराड तालुक्यातील भोसलेवाडीचे सुपूत्र विशाल भोसले हे गेल्या २० वर्षापासून रत्नागिरीत व्यवसायानिमित्त स्थित आहेत. समाजातील गरजूंना मदत करण्यासाठी ते वर्षभर विविध उपक्रम राबवतात.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:11 PM 10/Jan/2025