रत्नागिरी : चंद्रपूर येथे महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महामंडळाचे ५२ वे राज्य अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षकेतर बंधू- भगिनी मोठ्या संख्येने अधिवेशनात सहभागी होणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, शिक्षकेतर कर्मचारी संघटनांचे महामंडळ अंतर्गत हिशेबनीस रामचंद्र केळकर यांनी दिली.
अधिवेशन शहीद बालाजी रायपूरकर सभागृहात (पिंपळनेरी रोड, चिमूर, जि. चंद्रपूर) होणार आहे. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री दादा भुसे तसेच अनेक मंत्री उपस्थित राहणार आहे. माध्यमिक शाळेतील शिक्षकेतरांची नवीन भरती सुरू करणे.
शिक्षकेतरांसाठी बक्षी समितीने सुचवलेली आश्वासित प्रगती योजना म्हणजे १०-२०-३० लागू करणे. शिक्षकेतरांना पदोन्नतीची संधी देणे, शिक्षकेतर सेवक पदावर अनुकंपा तत्त्वावर भरती करणे यासह विषयावर चर्चा होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:05 AM 11/Jan/2025













