रत्नागिरी : जिल्ह्यात केंद्र शासनाच्या आपत्ती निवारण योजनेतून २५ बंधाऱ्यांची कामे मंजूर आहेत. सुमारे पावणे २०० कोटीची ही कामे आहेत. या कामांनादेखील सीआरझेडच्या परवानगी आवश्यक आहे. चेन्नई येथील आयआरएस कंपनीकडून अधिकृत नकाशे मिळाल्यानंतरच सीआरझेडची मंजुरी मिळणार आहे. बंधाऱ्याची ही सर्व कामे सीआरझेडच्या मंजुरीमुळे लांबणार असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील ही सर्व कामे हैद्राबादच्या कंपनीला देण्यात आली आहेत.
चेन्नई येथील या कंपनीच्या परवानग्यांमुळे जिल्ह्यातील अनेक विकासकामांमध्ये खोडा निर्माण झाला आहे. केंद्र शासनाच्या आपत्ती निवारण योजनेतून हे बंधारे मंजूर आहेत. यामध्ये आडे, कर्दै येथे २, कोळथे, लाडघर, मुरूड येथे २, हर्णे येथे २, पाजपंढरी, बुरोंडी, पाडले, सालदुरे, करजगाव हे सर्व दापोली तालुक्यातील तर भाटे, गावखडी, वायंगणी, घेरापूर्णगड, नेरूळ, गणेशगुळे, आरे, भंडारपुळे, गणपतीपुळे, नेवरे, वारे या रत्नागिरी तालुक्यातील धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांचा समावेश आहे. सर्व कामांना शासनाने मंजुरी दिली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:41 PM 11/Jan/2025













