रत्नागिरी : शहरातील साळवी स्टॉप येथील प्रवासी शेडमध्ये खेडमधील वृध्दाचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना रविवार १२ जानेवारी रोजी सकाळी ७.३० वा. सुमारास निदर्शनास आली.
प्रवीण जनार्दन साळवी (६५, रा. पटवर्धन लोटे खेड, रत्नागिरी) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या वृध्दाचे नाव आहे. प्रविण साळवी हे १० जानेवारी पासून साळवी स्टॉप येथील प्रवासी शेडमध्ये थांबलेले होते. या बाबत खबर देणाऱ्या दुकान मालकाने त्यांना नाव गाव विचारले. परंतु त्यांनी काही सांगितलेले नव्हते. दरम्यान, रविवार १२ जानेवारी रोजी खबर देणारे दुकान मालक सकाळी ७.३० वा. सुमारास आपले चप्पल दुकान उघडण्यासाठी गेला असता, त्यांना प्रवीण साळवी हे कोणतीही हालचाल करत नसल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने १०८ रुग्णवाहिकेतून प्रवीण साळवी यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी साळवी यांना तपासून मृत घोषित केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:53 PM 14/Jan/2025
