दापोली : नवानगर येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जालगाव : दापोली शहरातील नवानगर येथील संतोष सुरेश देवकर या ३६ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १४ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता उघडकीस आली. या घटनेची दापोली पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. याबाबत दापोली पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार संतोष सुरेश देवकर हा ३ जानेवारी २०२५ रोजी सकाळी साडेदहा वाजल्यापासून घरातून निघून गेला होता. त्याच्या घरातील लोकांनी त्याची सर्वत्र शोधाशोध करुनही तो आढळला नव्हता. मंगळवारी टाळसुरे गावातील स्मशानभूमीत एका झाडाला दोरीला लटकलेला त्याचा मृतदेह आढळून आला. या बाबत दापोली पोलीस ठाण्यात परशुराम देवकर यांनी खबर दिली. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक गायकवाड हे करीत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:26 AM 15/Jan/2025