रत्नागिरी : शहरानजीकच्या हातखंबा येथे ट्रेलरला मागून ठोकर देऊन स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत झालेल्या मोटार चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. नितीन श्रीकांत शिरवाडकर (६२, रा. निर्मलकुंज, प्लॉट नंर ७०, सायन ईस्ट मुंबई) असे मृत संशयित चालकाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. ११) दुपारी चारच्या सुमारास हातखंबा येथील टाटा टेल्को शोरुमच्या समोर घडली होती.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लिंकन अमृत पाल (रा. नुरपूर कामापूर, पो. छतपालगढ जि. प्रतापगड, राज्य उत्तर प्रदेश ) हे ट्रेलर (क्र. जीजे-२७ टी.एफ ६८१८) घेऊन गोवा ते मुंबई असे जात होते. शनिवारी सायंकाळी चारच्या सुमारास हातखंबा येथे टाटा टेल्को शोरुम समोर आले असता एका ढाब्याकडे ट्रेलर वळवित असताना पाठीमागून येणाऱ्या मोटार (क्र. एचएच-०१ एएक्स ९२८२) चालक शिरवाडकर यांना निष्काळजीपणे ट्रेलरला मागून धडक दिली. गंभीर जखमी शिरवाडकर याचा या अपघातात मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिस हवालदार रुपेश भिसे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:07 15-01-2025
