मंडणगड : लालबहादूर शास्त्री हायस्कूलमध्ये राज्य क्रीडा दिन साजरा

मंडणगड : येथील मंडणगड तालुका विकास मंडळ संचलित, लाल बहादूर शास्त्री हायस्कूल, दहागाव. मध्ये ऑलिंपिक वीर खाशाबा जाधव यांचा स्मृतिदिन,’ राज्य क्रीडादिन ‘ म्हणून साजरा करण्यात आला.

या निमित्ताने सर्वप्रथम प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. विजय खाडे यांनी दीप प्रज्वलन करून, खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.

यानिमित्ताने विद्यालयातील जिल्हास्तरीय खेळाडू कुमारी गायत्री महाडिक हिचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर प्राथमिक व माध्यमिक गटातून वकृत्व स्पर्धा घेण्यात आल्या.

यामध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.

प्राथमिक गटातून

१)ईश्वरी खामकर इयत्ता सातवी प्रथम क्रमांक

२)आर्या तांबुटकर पाचवी द्वितीय क्रमांक

३)स्मरणिका गायकवाड सातवी तृतीय क्रमांक

तसेच माध्यमिक गटातून १)कुमार श्रेयश सुतार इयत्ता दहावी प्रथम क्रमांक

२)कुमारी सिया येरवणकर इयत्ता आठवी द्वितीय क्रमांक

३) कुमारी श्रावणी जाधव व संजीवनी शिगवण या विद्यार्थिनींना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला.

या स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून, सौ. विनया नाटेकर श्री. जितेंद्र कलमकर व सौ. मानसी पालांडे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले .

विद्यालयातील क्रीडा शिक्षक श्री. मनोज चव्हाण यांनी विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात आपले नैपुण्य दाखवले; तर तुम्ही जीवनात यशस्वी होऊ शकता. खाशाबांचा आदर्श घेऊन स्वतःला घडवण्याचा प्रयत्न करा .त्यांची जिद्द ,सचोटी अंगीकारा असे सांगितले.

यानंतर मुख्याध्यापक श्री. विजय खाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अभ्यासाबरोबरच, आपल्या कलागुणांना वाव देऊन ,त्यांच्या विकासातून तुम्हाला जीवनात यशस्वी होता येईल. असे संबोधित केले.

या कार्यक्रमाला श्री. विक्रम शेले ,सौ.अनिता पवार, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:28 16-01-2025