लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार करणाऱ्यांचे थेट बँक खातं सील होणार; आदिती तटकरेंचा इशारा

मुंबईः लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून स्त्रीयांऐवजी पुरुषांनीच एक किंवा एकापेक्षा जास्त अर्ज केल्याचा प्रकार पुढे आला आहे. असे प्रकार रोखण्यासाठी राज्य शासन कठोर पावलं उचलत असून अशा लोकांच्या बँक खात्यावर कारवाई होणार आहे.

एका व्यक्तीने लाडकी बहीण योजनेचे ३८ अर्ज भरुन पैसे उचलल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी उघड झाला होता.

राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत एका व्यक्तीने ३८ अर्ज भरलेत. त्याने ⁠वेगवेगळ्या नावाने हे अर्ज भरले आणि पैसे काढले. त्यामुळे ⁠संबंधित बँकांना याबाबत कळवून पैसे परत मिळवण्याचे आदेश दिलेत आहेत.

तटकरे पुढे म्हणाल्या की, अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्यांचे बँक खाते सील केले जाणार आहेत. ⁠त्या खात्यांशी कोणतेही शासकीय व्यवहार केले जाणार नाहीत. ⁠१५-२० दिवसांमध्ये व्हेरीफिकेशन केले जाईल. ⁠२५ तारखेपासून जे पैसे मिळतायेत त्या महिलांनी पहिल्या दोन महिन्यात अर्ज केले होते त्यांना दिले जात आहेत.

काय म्हणाल्या आदिती तटकरे?

लाडकी बहीण योजनेसाठी ⁠दोन कोटींपेक्षा जास्त अर्ज आले आहेत. त्या अर्जांची छाननी केली जात आहे. चौकशीत ज्या नागरिकांनी दुसरेच आधारकार्ड वापरुन लाभ घेतला असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

⁠ते ३८ बँक खाते महिलांचे नाहीयेत असं प्राथमिक चौकशीत समोर आलेलं आहे. ⁠ज्या महिलांची नावे वापरण्यात आली आहेत, त्यांच्यादेखील खात्यांची चौकशी केली जाणार आहे. सध्या लाभार्थी महिलांना ⁠तिसरा हफ्ता वितरित होत आहे.

गडकरींबद्दल तटकरे म्हणाल्या…

  • गडकरी साहेब महाराष्ट्राकरता आदरणीय व्यक्ती आहेत
  • ⁠त्यांच्याकडून आम्हाला प्रेरणा मिळते
  • ⁠ते काय बोलले हे मला माहिती नाहीये
  • ⁠पण नागपूरमधील कार्यक्रमात त्यांनी या योजनेचे कौतुक केलं होतं

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:57 01-10-2024