वाशिष्ठीतील गाळ उपसा मोहीम गतीने राबवा : आ. शेखर निकम

चिपळूण : चिपळुणातील वाशिष्ठी नदीतील गाळ उपसा अधिक गतीमान करण्याची गरज आहे. सध्यस्थितीत निधी पुरेसा आहे. मात्र, आवश्यक ती यंत्रसामुग्री नाही. त्यामुळे पाटबंधारे खात्याने साताऱ्यात पाठविलेली यंत्रसामुग्री तत्काळ मागवून घ्यावी. त्याचे महसूल आणि पाटबंधारे विभागाने नियोजन करावे आणि केलेल्या कार्यवाहीबाबत येत्या पंधरा दिवसात आढावा द्यावा, अशा सूचना आ. शेखर निकम यांनी चिपळूणच्या गाळप्रश्नी घेतलेल्या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

वाशिष्ठी नदीतील गाळ उपसाबाबत आ. निकम यांच्या उपस्थितीत प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे, पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता गणेश सलगर, उपविभागीय अभियंता विपुल खोत, मुख्याधिकारी विशाल भोसले, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, जलसंपदा यांत्रिकी विभागाचे साळुंखे, बचाव समितीचे बापू काणे, अरूण भोजने, राजेश वाजे, उदय ओतारी, महेंद्र कासेकर, उमेश काटकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष नितिन ठसाळे, संतोष तडसरे, मिलींद कापडी आदींसमवेत बैठक झाली. या बैठकीत नदीतील गाळ उपसाबाबताच्या नियोजनावर चर्चा झाली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:11 PM 27/Jan/2025