जि.प.पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा मेर्वी शाळेत महात्मा ज्योतीराव फुले जयंती उत्साहात साजरी

गावखडी / वार्ताहर : रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा मेर्वी शाळेत महात्मा ज्योतीराव फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या प्रारंभीस महात्मा ज्योतीराव फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार जि.प. मेर्वी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शर्वरी करगुटकर यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला . या प्रसंगी उपशिक्षकश्री.चंद्रशेखर पेटकर, शिक्षिका सौ.श्रेया रसाळ, बालसभेतील कु.मैत्रेयी अभ्यंकर, स्वरा गोठणकर आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली होती.

या प्रसंगी मुख्याध्यापिका सौ. शर्वरी करगुटकर ,उपशिक्षक श्री.चंद्रशेखर पेटकर आदि अध्यापक यांनी महात्मा ज्योतीराव फुले जयंतीनिमित्त महात्मा ज्योतीराव फुले यांच्या जीवनातील प्रसंग आपल्या मनोगतातून कथन केले.

शेवटी शिक्षिका सौ.श्रेया रसाळ यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता झाली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:29 12-04-2025