कडवई : संगमेश्वर तालुक्यातील शृंगारपूरमध्ये एस.टी. चालक आणि वाहकांना राहण्यासाठी व्यवस्था होत नसल्याने बस फेऱ्या मध्येच थांबवल्या जात होत्या. सरपंच विनोद ऊर्फ बापू पवार यांच्या ही समस्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने आणि ग्रामपंचायत फंडातून कातुर्डी कोंड या ठिकाणी चालक आणि वाहक यांच्यासाठी विश्रांतीगृह उभारले. अनेक वेळा वयोवृद्ध ग्रामस्थांना तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना बस फेरी पुढे येत नसल्याने अडचणींना सामोरे जावे लागत होते. मात्र ही समस्या कायमची दूर होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:19 AM 29/Jan/2025













